संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरात दिघी नाक्यावर रात्री ९वा. अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्याची नोंद म्हसळा पोलीसानी केली आहे. अल्पवयीन मुलगी चायनीज घेऊन घनसार कॉम्लेक्स मधील आपल्या घरी जात असताना घटना घडल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले.म्हसळा पोलीसानी गु.र.नं.४१/२०२१ भा.द.वि.कलम ३७६ (२), (आय )(जे) सह बाल लैंगिक अपराधा पासून सरक्षण अधिनीयम कायदा (पोस्को) २०१२, कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलगी दिघी नाक्यावरील रिक्षा स्टँडजवळील चायनीज सेंटर मधून चायनीज घेऊन घनसार कॉम्लेक्स मधील आपल्या घरी जात असताना जिन्या जवळच दबा धरून बसलेल्या सुमारे २४ वर्षीय अविवाहीत युवकाने मुलीचा हात धरून तीच्या खोलीत नेऊन बलात्कार केल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले. आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून पुढील तपास स.पो.नी.उद्धव सुर्वे उप-विभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन बापूसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
आरोपी चे नाव
ReplyDeletePost a Comment