रायगडमध्ये शिवसेना फुटीच्या उंबरड्यावर : गितेंना लोकसभा पराभव लागला जिव्हारी


रायगडमध्ये शिवसेना फुटीच्या उंबरड्यावर : गितेंना लोकसभा पराभव लागला जिव्हारी  :  तिन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्याचे आदेश

म्हसळा (निकेश कोकचा )
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून केंद्रिय मंत्री तथा  शिवसेना नेते अनंत गिते यांना स्वताचा झालेला पराभव जिव्हारी लागला असून, त्यांनी या पराभवाची खापर श्रीवर्धन मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर काढली आहे. श्रीवर्धन, म्हसळा व तळा या तिन तालुक्यांतील शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांसहीत सर्व पदाधिकाऱ्यांना सक्तीने राजीनामा देण्याचा फरमान गिते यांनी काढला आहे. गितेंच्या या निर्णयामुळे रायगड जिल्हयातील शिवसेना फुटीच्या उंबरडयावर पोहचली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या रायगड- रत्नागिरी मतदारसंघातून ना.गितेंविरोधात  राष्ट्रवादी तर्फे रायगडचे माजी पालकमंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना पुन्हा संधी मिळाली. २०१४ च्या निवडणूकी मध्ये अपक्ष तटकरेंमुळे महाराष्ट्रातून सर्वात कमी म्हणजे २११० मतांनी सुनिल तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र २०१९ च्या निवडणूकीमध्ये तटकरे यांनी २०१४ च्या पराभवाचा वचपा काढीत तब्बल ३१४३८ मतांनी खासदारकीचा षटकार मारणाऱ्या शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना पराभवाची चव दाखवून दिली. २०१४ मध्ये तटकरेंचा पराभव होऊन देखील त्यांनी रायगड जिल्हयात आपल्या बुद्धीच्या जोरावर राज्य सरकारमार्फत विकास कामांचा धुमधडाका लावला तर विजयी होऊन केंद्रिय मंत्री स्थानी पोहचलेल्या गिते यांनी जनतेकडे पाठ फिरवली. गावागावांमध्ये सुनिल तटकरे यांच्या मार्फत विकास गंगा पोहचत असताना माजी केंद्रिय मंत्री अनंत गिते यांच्या  निष्क्रीयतेमुळे जनतेसमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढत गेल्या. राष्ट्रवादी पक्षाला रोखण्यासाठी शिवसैनिक विकासकामे मागत होते तर शिवसेनेचे खासदार कुणबी मतांच्या जोरावर विकासकामे न करता निवडूण येण्याचे स्वप्न पाहत होते ही सत्य स्थिती आहे. गिते यांच्या अहंपणाच्या स्वभावामुळे जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी देखील झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेला मतदान करण्याचे टाळले असल्यानेच गिते यांचा पराभव झाला असल्याचे एका वरिष्ठ शिवसैनिकानी सांगितले.
सहा वेळा खासदार राहीलेल्या शिवसेना नेते अनंत  गिते हे स्वताच्या पराभवासाठी स्वतःच कारणीभूत असताना त्यानी आपल्या पराभवाची खापर म्हसळा, श्रीवर्धन व तळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर फोडली असून या तिनही तालुक्यातील तालुका प्रमुखांसहीत सर्व कार्यकरणीला सक्तीने राजीनामा देण्याचे आदेश पराभूत गिते यांनी दिले आहेत. गिते यांच्या या निर्णयामुळे श्रीवर्धन मतदारसंघासहीत संपुर्ण जिल्हयामध्ये शिवसेना पक्ष फुटण्याच्या उंबरड्यावर पोहचला आहे.

आयात नेता चालेल पण गिते नको...
बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्हयामध्ये शिवसेनेला लागलेली गळती थांबवायची असेल तर आम्हाल कोणताही आयात नेता चालेल पण गिते नकोत अशी भूमिका शिवसैनिकांच्या चर्चेमधून समोर येत आहे.


म्हसळा तालुकाप्रमुखपदी महादेव पाटिल ?
माजी केंदीय मंत्री अनंत गिते यांनी आपल्या पराभवाची खापर सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांवर फोडल्याचे समोर येत आहे. यामुळे गिते यांनी तिन तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देखील मागवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या तिन तालुक्यांमध्ये म्हसळा तालुक्याचा देखीस समावेश असुन नविन  तालुकाप्रमुख पदी माजी सभापती महादेव पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा