राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसेला उभारी: राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला मनसेत प्रवेश...


दिघी : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांचा नुकताच रायगड दौरा संपन्न झाल्यामुळे मनसेला पुन्हा एकदा उभारी येताना दिसत आहे . श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून दिघी गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा उदघाटनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे यावेळी मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी , जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष अमोल पैडकर , तालुका संपर्क अध्यक्ष शेखर सावंत , तालुका अध्यक्ष राजेश लोहार , तालुका उपाध्यक्ष वैभव खैरे आदी उपस्थित होते दियी गावात राष्ट्रवादीला खिंडार पडले असून कार्यकत्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला असून मनसेची शाखा स्थापन करण्यात आली आहे या शाखेच्या महिला अध्यक्ष पदी गोदावरी चिकाटी , शाखाअध्यक्ष पदी हरिश्चंद्र भालदार व गण अधिकारी अनिल टकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी दियी गावातील ३५ कार्यकत्यांनी राष्ट्रवादीतून मनसेत प्रवेश केला आहे गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयाला अनुसरून घेतलेल्या भुमिकेमुळे आकर्षित होऊन आपण मनसेत प्रवेश केला आसल्याचे मनोगत त्यांनी प्रवेशा वेळी कार्यकर्यांनी व्यक्त केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा