डॉ. प्रियांका देशमुख यांचे काम कौतुकास्पद: गावोगावी जाऊन देत आहेत कोविशिल्ड चा डोस

फोटो- म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम कोकबल या गावांमध्ये लसीकरण करताना सरपंच स्नेहा सोलकर,डॉ.प्रियांका देशमुख ,माजी उप सरपंच पांडुरंग मांडवकर व ग्रामसेवक योगेश पाटील दिसत आहेत.


म्हसळा(निकेश कोकचा)


लॉक डाऊन काळात सार्वजनिक वाहतूक बंद असून तालुक्याचा ठिकाणी कोरोना लस घेण्यासाठी येणे हे  खेडेगावातील नागरिकांसाठी मोठे आर्थिक भुर्दंड सारखे वाटत आहे.त्यामुळे लसीकरणावरही याचा मोठा परिणाम दिसून येतो.मात्र म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.प्रियांका देशमुख या आपल्या टीम सोबत गावोगावी जाऊन नागरिकांचे लसीकरण करत असल्याने तालुकास्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटे पासून वाचायचे असेल तर दो गज की दुरी मास्क है जरुरी सोबत कोरोनाची लस घेणेही आवश्यक आहे.शासनातर्फे कोरोनापासून बचावासाठी लसीकरणावर  जोर  देण्यात आला असला तरी, सर्वसामान्यांसाठी लसीकरण करून घेणे कठीण झाले आहे.लॉक डाऊन काळात सार्वजनिक वाहतूक बंद असून सर्वसामान्यांचा रोजगार देखील गेला आहे.हातामध्ये खाण्यासाठी पैसे नसताना लस घेण्यासाठी खाजगी वाहतूक करून लसीकरण केंद्रावर जाणे हे आवाक्याचा बाहेरचे आहे.यामुळे म्हसळा तालुक्यातील लसीकरणाची वेग मंदावू लागला होता. मात्र प्र. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रियांका देशमुख यांनी आरोग्य सेविका ज्योती कदम,आरोग्य सेविका गीता,आरोग्य सेवक सागर सायगवकर यांच्या सोबत गावोगावी जाऊन ग्रामपंचायत स्थरावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली.या मोहिमे अंतर्गत खेडेगावातील नागरिकांना त्यांचा गावा मध्ये कोवीशिल्ड लस उपलब्ध करून देण्याचे काम ही आरोग्य टीम करीत आहे.डॉ. देशमुख यांनी आठवड्यात पाभरा येथे 200, घोणसा येथे 130, कोकबल येथे 60 व घुम येथे 60 जणांचे लसीकरण करून घेतले आहे.डॉ. गायकवाड व डॉ. देशमुख यांच्या लसीकरण मोहीमेमुळे गावागावात जनजागृती निर्माण झाली असून नागरिक स्वतःहून लसीकरणा साठी पुढे येत आहेत.


कौतुकास्पद-
सध्या कोरोना महामारीत अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत.मात्र या रोगापासून नागरिकांना वाचण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे असल्याने म्हसळा पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी यांनी स्वतःचा कुटुंबाचा विचार न करता त्यांचा पत्नी प्राजक्ता राजेश कदम यांना आरोग्य टीम सोबत लसीकरणासाठी कामामध्ये मदत करण्यासाठी कोकबक व घुम येथे पाठवले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा