म्हसळा(निकेश कोकचा)
ग्रामीण रुग्णालय म्हसळा व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आलेल्या नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते शनिवार दिनांक २९ मे रोजी ग्रामीण रुग्णालय येथे पार पाडण्यात आला.
राज्यातील ग्रामविकास विभागाकडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात आठ रुग्णवाहिकांना मंजुरी मिळाली आहे.त्यापैकी दोन रुग्णवाहिका या म्हसळा ग्रामीण रुग्णालय व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर होऊन आल्या होत्या.या दोनही रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते कार्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली,जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाजीम हसवारे,सभापती छाया म्हात्रे,उप सभापती संदीप चाचले,सदस्य उज्वला सावंत,तालुका अध्यक्ष समीर बनकर,प्रांताधिकारी अमित शेडगे,तहसीलदार शरद गोसावी,गट विकास अधिकारी प्रभे,डॉ.महेश मेहता,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड,म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्यासहित सरकारी अधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री तटकरे यांनी ग्रामीण रुग्णालयात सुरु होत असलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी करून लवकरात लवकर कोविड सेंटर सुरु करण्याबाबत सूचना केल्या.
फोटो-चालकाला रुग्णवाहिकेची चावी देऊन म्हसळा ग्रामीण रुग्णालय व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना पालकमंत्री अदिती तटकरे व इतर अधिकारी दिसत आहेत.छाया निकेश कोकचा
Post a Comment