म्हसळ्यामध्ये शिवसेनेचा धुव्वा : राष्ट्रवादीकडे ९ तर शिवसेनेकडे दोन ग्रामपंचायत : एक विकास आघाडी कडे

म्हसळ्यामध्ये शिवसेनेचा धुव्वा : राष्ट्रवादीकडे ९ तर शिवसेनेकडे दोन ग्रामपंचायत : एक विकास आघाडी कडे


म्हसळा वार्ताहर

   म्हसळा     तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेचा मात्र या निवडणुकांमध्ये धुव्वा उडाला आहे.जिल्हापरिषद,पंचायत समिती पाठोपाठ आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी पक्षाने आपली प्रतिष्ठा कायम ठेवली आहे.मात्र शिवसेनेला आपल्या ताब्यात असलेल्या चार ग्रामपंचायती पैकी केवळ एकाच ग्रामपंचायती राखता आली.तर राष्ट्रवादीला आपल्या ताब्यातील नेवरूळ ग्रामपंचायत गमवावी लागली.मात्र सेनेच्या ताब्यातील वरवटने,भेकर्याचा कोंड या ग्रामपंचायती राष्ट्रवादीने खेचून आणल्या.सेनेच्या ताब्यात असणारी आडी महाड खाडी ही ग्रामपंचायत विकास आघाडीकडे गेली.यामुळे शिवसेनेला तालुक्यातील मतदार नाकारताना दिसत असून आ.सुनील तटकरे यांच्या विकासकामांना पसंती दिल्याचे या निवडणूक निकालांवरून दिसून येत आहे.तालुक्यातील प्रतिष्ठेच्या केलेल्या पांगलोली व वरवटने या ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढतीत कुरघोडीच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बाजी मारली.
कोळवट ग्रामपंचायती मध्ये सरपंच पदासाठी शिवसेनेचे राजाराम गणपत तीलटकर ८२ मताधिक्याने विजयी झाले.मात्र ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे सदस्य जास्त निवडून आल.साळविंडे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या सोनल महेश घोले ३६१ मताधिक्यानी विजय झाल्या.नेवरूळ ग्रामपंचायतीमध्ये सेनेच्या आर्या अंकित महागावकर २२ मताधिक्यानी विजयी झाल्या.वरवटने ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या १९२ मताधिक्यानी विजयी झाल्या.घूम ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादीचे केतन पांडुरंग आग्रे १४३ मतांनी विजयी झाले.त्यांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव केला.चिखलप ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे अनिल रावजी जोशी १४९ मतांनी बाजी मारली.आडी महाड खाडी या ग्रामपंचायतीमध्ये मात्र  गाव विकास आघाडीचे उमेदवार प्रकाश गुणाजी म्हसकर यांनी १७४ मतांनी मात दिली.भेकर्याचा कोंड या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या जस्मिता जयवंत शिगवण यांनी २५ मतांनी विजय प्राप्त केला.कुड्गाव ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादीचे दिया अनिल निवाते यांनी ६४ मताधिक्यानी विरोधकांवर मात केली.या निवडणुकींमध्ये ठाकरोली व जांभूळ ग्रामपंचायती बिनविरोध काढून राष्ट्रवादीने पहिलेच बाजी मारली होती.

तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या पांगलोली ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तथा अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अली कौचाली व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.मोईज शेख यांची परस्परविरोधी प्रतिष्ठा पणाला लागली होती.मात्र या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली यांचे पुत्र बिलाल कौचाली यांनी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारावर ४० एवढे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीचा गड कायम राखला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा