संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संपूर्ण देशावर व जगावर होत असलेले भीषण परिणाम पाहता पंतप्रधान नरेंद मोदी यानी लॉकडाऊनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना म्हसळा कराना करावा लागणार आहे.17 मे पर्यंत लॉकडाऊन चालु राहणार आहे.राज्यातील मुंबई, ठाणे, पनवेल आणि पुणे ही मोठी शहरे कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. ही सर्वच शहरे भौगोलीक दृष्टया रायगडकरांसाठी लागूनच आहे, या भागातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. हा हॉट स्पॉट परीसर वगळून काही ठिकाणी टाळेबंदी शिथिल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांनी गर्दी करू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे, आसे मत सर्वच स्तरावरून नागरीक मांडत आहेत.
लॉक डाऊनच्या २५ मार्च ते १४ एप्रिल या पाहील्या कालावधीत म्हसळा करांसाठी सकाळी ८ते १२ व सायंकाळी ४ ते ६ अत्यावश्यक सेवा नियमांचे पालन करून सुरु असत, १४ एप्रिल ते ३ मे या दुसऱ्या टप्प्यातही त्याच कालावधी साठी अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार होत्या,परंतु एप्रिलच्या तिसऱ्या आठवडयात श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथे कोरोना + रुग्ण सापडत्यामुळे श्रीवर्धन तालुका लॉक डाऊन झाल्याने म्हसळा बाजारपेठेवर ताण पडून सर्वच नियमांचे उल्लंघन झाले, त्यामुळे २२ एप्रिल पासून म्हसळा बाजारपेठ पोलीस प्रशानाने लॉक डाऊनच्या कडक निर्बंधात आणली. आता ३ मे ते १७ मे या तिसऱ्या टप्प्याकडे प्रशासन व जनता कसे पहाणार हा चर्चेचा व तेवढाच गांभीर्याचा विषय झाला आहे.
सर्वच स्तरावरून होत आहे कौतुक
"तालुक्यातील नागरिक आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभाग , पोलीस व महसुल प्रशासन, ग्रामविकास व नगरपंचायत पंचायत प्रशासन, पत्रकार , स्वदेश, तालुक्यातील नागरिकाना मदत करणाऱ्या विविध,सामाजिक संस्था यांचे कौतुक होत आहे."
सध्य स्थितीत म्हसळा शहरात आत्यावश्यक सेवेतील दूध व भाजीपाला विक्री सकाळी ८ ते१२ ,मेडीकल स्टोअर्स संपूर्ण दिवसभर उघडी असतात म्हसळा तालुक्यात म्हसळा नगर पंचायत हद्दीत व ३९ ग्रामपंचायतील कोणत्याही गाव वाडीत म्हसळ्यातील लॉक डाऊन शिथील होणार का?
सोशल डीस्टंस पाळायचा कोणी ? व्यापारी व ग्राहकानी आपल्यावरच नियम घालणे गरजेचे आहे का ? किंवा प्रशासनाने कायद्याने जनते जवळ वागावे ?
म्हसळा लाईव्ह च्या वाचकांच्या प्रतिक्रिया ...
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ऑरेंज झोन मधील काही नियम प्रशासनाने क्षितील केल्यामुळे म्हसळा शहर आणि परिसरामध्ये मोट्या प्रमाणात चाकरमानी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्थानिक प्रशासनास आता पहिल्यापेक्षा जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.जनतेने सुद्धा आपली विवेकबुद्धी जागृत ठेऊन स्वयं प्रेरणेने सोशल डिस्टनशिंग पळाले पाहिजे.
ReplyDeletePost a Comment