श्रीवर्धन तालुक्याला वेध टाळेबंदी शिथीलतेचे ; जनतेचे लक्ष प्रशासनाच्या निर्णयाकडे


मकरंद जाधव- बोर्लीपंचतन
कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर देशामधे १७ मे पर्यंत टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे हे या लॉकडाउनचा सर्वंकश विचार करुन राज्यातीत अॉरेंज व ग्रीन झोनमधील टाळेबंदी शिथील करुन काही आवश्यक उद्योगधंद्याना नियमांचे पालन करुन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेत आहेत.
  रायगड जिल्ह्यामधील पनवेल महानगरपालिका क्षेत्र व उरण तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग नाही त्यामुळे रायगड जिल्हा आता रेड झोनमधुन अॉरेंज झोनमध्ये आला आहे.ही रायगडवासीयांसाठी थोडीफार समाधानाची बाब आहे त्यामुळे शेतकरी,कष्टकरी,मजुर, गोर-गरीब व लघुउद्योजक या घटकांचा योग्य तो विचार करुन तसेच तोंडावर आलेला पावसाळा व मान्सुनपुर्व कामे पुर्ण करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यामध्ये टाळेबंदीमध्ये थोडीफार शिथीलता तालुका प्रशासनाकडुन करण्यात येईल का ? असा प्रश्न तालुकावासीय करीत आहेत.
 श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथे मुंबई येथील कोरोनाचा प्रथम हॉटस्पॉट असलेल्या वरळीतुन आलेल्या कुटुंबामुळे तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला होता परंतु महसुल,आरोग्य व ग्रामविकास प्रशासनाने तातडीने पावले उचलुन व वेळीच पुढील धोका ओळखुन केलेले नियोजन तसेच पोलीस प्रशासनाने दिवस रात्र चोख बंदोबस्त ठेऊन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची घेतलेली दक्षता त्यामुळे भोस्ते येथील त्यांच्या कुटुंबातील दोघां पती-पत्नी व्यतिरीक्त संपर्कात आलेल्या ईतर सर्वांचे रीपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने श्रीवर्धन तालुका प्रशासनाची थोडीफार काळजी कमी झाली असुन कोरोना संक्रमणाचा संभाव्य धोका टाळण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे.भोस्ते येथील कोरोना पॉझीटीव्ह रीपोर्ट असणारे पती-पत्नी पनवेल येथील रुग्णालयात असुन त्यांच्यात लवकरच सुधारणा होउन ते सुखरुप घरी येतील असा प्रशासनाला विश्वास आहे.त्यामुळे आता श्रीवर्धन तालुक्यातील महत्वाच्या असणाऱ्या बाजारपेठांमधील जिवनावश्यक व इतर आवश्यक छोट्या उद्योगधंद्यांना प्रशासनाने शिथीलता देउन नियमांचे पालन करुन ते सुरु करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेतुन होत असुन प्रशासनाने याबाबत सकारात्मक दृष्टीकोनातुन विचार करावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनीधींनकडुनसुध्दा होत आहे.
   श्रीवर्धन तालुक्यामध्ये आत्तापर्यंत प्रशासनातील सर्व घटकांनी चोख नियोजन करुन चांगले काम केल्याने तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यात यश आले आहे.परंतु आता तोंडावर आलेल्या पावसाळ्याची कामे उरकण्यासाठी आजुबाजुची खेडेगावे व त्यातील ग्रामीण जनता ज्या मुख्य बाजारपेठांवर अवलंबून आहेत त्या बाजारपेठेमधील जीवनावश्यक वस्तुंची बंद असलेली व काही आत्ता आवश्यक असणाऱ्या सेवांची दुकाने सुरु करुन टाळेबंदीमुळे आधीच संकटात सापडलेले लघुउद्योजक, शेतकरी,मजुर,गोरगरीब,कष्टकरी त्याचप्रमाणे हातावर पोट असलेले या घटकांतील जनतेची होणारी परवड लक्षात घेउन व ग्रामीण भागातील अर्थचक्राला थोडीफार  गती देण्यासाठी प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेउन या घटकांना दिलासा देण्यासाठी मार्ग काढावा अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा