संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोवीड -१९ च्या प्रचंड प्रादुर्भावामुळे जगात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम इतर घटकांबरोबर शालेय शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी आणि पालकांवरही झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात सातत्याने घरात असल्याने अथवा अन्य काही कारणांमुळे मुलांच्या वागण्यात काही बदल झाल्याचे जाणवल्यास तुम्हाला घरबसल्या समुपदेशन घेता येणार आहे. होय, हे आता शक्य आहे. कारण राज्यातील विद्यार्थ्यांना समुपदेशन व करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने चारशेहुन अधिक समुपदेशकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रश्नांचे किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांसह पालक शैक्षणिक परिस्थितीबद्दल संभ्रमात आहेत. अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या विविध समस्या तसेच करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकाच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात रायगड जिल्ह्यातील एकूण १० समुपदेशक असून ते जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना विविध विषयांवर मार्गदर्शन व समुपदेशन करतील. सकाळी १० ते ५ या वेळेत भ्रमणध्वनीद्वारे जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक खालील समुपदेशकांची संपर्क साधू शकतील असे जिल्हा परीषद शिक्षण विभागाने कळविले आहे.
१) संजय जाधव -9422594844/9657079344
२) साईनाथ पाटील -9309509895
३) पन्हाळकर विनोद- 9762254344
४) म्हात्रे शुभांगी- 9930078547
५) शेख शाहीन -- 9987582610
६) सईदा कारभारी - 9765604032
७) लूमपटकी जया- 9920929779
८) थोरात दीपक - 9763024086
९) कुंभार नंदकुमार - 9221066430
१०) परदेशी मच्छिंद्र- 9763066895
"मा संचालक एस.सी.ई.आर. टी. पुणे यांनी घेतलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह असून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालकांच्या हिताचा आहे. कोवीड - १९ मुळे निर्माण झालेल्या विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रम अवस्था दुर करण्या साठी महाराष्ट्रातील सर्वच समुपदेशक नक्कीच प्रयत्नशील राहतील. या समुपदेशकांच्या मार्गदर्शन व समुदेशन सेवेचा जिल्हयातील विद्यार्थी व पालकांना नक्कीच फायदा होईल."
संजय र.जाधव,शिक्षक समुपदेशक, भेलोशी ,महाड.रायगड जिल्हा रायगड.
“ करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शिक्षण परिषदेमार्फत लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याद्वारे सर्व पालकांपर्यंत आणि मुलांपर्यंत पोहोचून आपले शिक्षण आपण या काळात सुद्धा चालू ठेवू शकतो. त्यासाठी वेगवेगळी संकेतस्थळे, पोर्टल, प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक एप्लिकेशन्स यांचा वापर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी आवश्य करावा"
गजानन साळुंखे, केंद्र प्रमुख , म्हसळा
बालभारतीकडूनही इयत्ता १ ली ते १२ वी च्या राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित पाठयपुस्तकांची निर्मिती करण्यात येते. या काळातही बालभारतीकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पाठयपुस्तके, ऑनलाइनसाठी ई लर्निंगची संकेत स्थळे, व्हिडीओ स्वरूपातील साहित्य, किशोर मासिक अशा साधनांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. याच सोबत विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठीही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या रूपात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भाषांमधील ९ लक्ष ८० हजार पुस्तके ई-बुक स्वरुपात या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. तर गुगलद्वारा निर्मित बोलो हे ऍप्लिकेशन मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे याचाही विद्यार्थ्यांनी व पालकानी वापर करावा "
संतोष शेडगे , गट शिक्षण अधिकारी, म्हसळा
Post a Comment