मांदाटणेकर पवार बंधुंची सातासमुद्रापलीकडे झेप! बाॅडीबिल्डींग स्पर्धेत मिळविले रौप्य पदक.



विनायक जाधव
यशाचे शिखर गाठण्याच्या उद्देशाने झपाटलेली माणसे, आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी मागे वळून पाहत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले रायगड जिल्हा, म्हसळा तालुक्यातील मांदाटणे गावचे गावचे सुपुत्र पवार बंधु अर्थात सुशील भिमराव पवार आणि सुशांत भिमराव पवार होय. नुकत्याच हाॅन्गकाॅन्ग येथे संपन्न झालेल्या जागतिक बाॅडीबिल्डींग स्पर्धेत पवार बंधुंनी द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) पटकावल्याचे जाहीर झाले आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकला. या यशाबद्दल पवार बंधुंवर सर्वस्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी खेडेगावातुन मुंबईला आलेल्या पवार बंधुंचा आजपर्यंतचा प्रवास फार खडतर आहे. आशिया खंडातील प्रसिध्द असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीत वास्तव्याला असताना तेथील जीवनप्रणाली पाहुन, पवार बंधुनी आपली जीवनशैली बदलण्याचा निश्चय करून मेहनतीचे बाॅडीबिल्डींग क्षेत्र स्विकारले. गेली सोळा वर्षे पवार बंधु या क्षेत्रात मेहनत करीत आहेत. दहा वर्षाच्या अथक परीश्रमाने लालबाग येथे पवार बंधुनी बाॅडी गराझ या नावाने युनीसेक्स फिटनेस सेंटर सुरू केले. या सेंटरमध्ये अनेक युवक/युवती, महीला/पुरुष प्रशिक्षण घेत आहेत. म्हणतात ना हिंमत ए मर्दा, मदद ए खुदा याप्रमाणे एक दशकानंतर पवार बंधुंच्या प्रगतीला सुरूवात झाली.
प्रस्तुत प्रतिनीधीशी फोनवरून संवाद साधताना पवार बंधु म्हणाले की, सुवर्णपदक जिंकण्याच्या ईर्षेनेच तयारी केली होती पण थोडक्यात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. आगामी जागतिक स्पर्धेत पहीला क्रमांक अर्थात सुवर्ण पदक मिळविणारच असा जबरदस्त आत्मविश्वास पवार बंधुनी व्यक्त केला. या यशाचे श्रेय आईवडील आणि प्रशिक्षक श्री. सुहास खामकर, श्री. संदिप जाधव यांना जाते असे पवार बंधुनी सांगितले.

3 Comments

  1. Pawar bandhunchya yasha saathi tyanna khup khup shubheccha!!!

    ReplyDelete
  2. Pawar bandhunchya yasha saathi tyanna khup khup shubheccha!!!

    ReplyDelete
  3. Pawar bandhunchya yasha saathi tyanna khup khup shubheccha!!!

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा