संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
दिघी माणगाव पुणे या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे माणगाव - म्हसळा- दिघी या मुख्य टप्प्यांत महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ महामार्गालगतच्या शेतकऱ्यांची फसवणुक करीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने डॉ. मुईज शेख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यालगतचे शेतकरी, शिवसेना व कॉंग्रेस कार्यकर्त्यनी आंदोलन छेडले. या विषयी येत्या २७ नोव्हेंबरला माणगाव, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यांतील शेतकरी म्हसळा तहसील कचेरीवर डॉ. मुईज शेख यांच्या नेतृत्वा खाली मोर्चा आणणार आहेत. दुसऱ्या बाजूने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील १८ गावं आगरी संघटननेने सुध्दा अशाच पध्दतीने आंदोलन छेडले आहे. त्यांच्या समवेत सुध्दा रस्त्यालगतचे सर्व शेतकरी आसल्याचा संघटनेचे अध्यक्ष महादेव पाटील यांचा दावा आहे. रस्ता व aquisatiation संर्दभात प्रांत, तहसीलदार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC)चे अधिकारी यांच्या समवेत किमान तीन- चार बैठका झाल्या असल्याचा पाटील यांचा दावा आहे.आवश्यकता वाटल्यास राज्य शासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC) यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार येणार असल्याचे पाटील यानी सांगितले
दुसऱ्या बाजूने राज्य शासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC) ने माणगाव -दिघी या राष्ट्रीय महामार्गाचे कामातील माणगाव ते साई चेक पोष्ट या टप्प्यातील शेतकऱ्यांचे शेत व बागायती जमीनीवर माती भराव व कटींग करुन कामाची चाल गतीमान केली आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या दोन संघटनेकडे गेल्याने पिडीत शेतकरी द्विधा मनस्थितीत झाले आहेत.
Post a Comment