माणगाव - म्हसळा -दिघी रस्त्याचे काम तात्काळ बंद करा : शेतकरी संघर्ष संघटनेची मागणी ; शेतकऱ्याना कायदा हातात घेयला लावू नका शासनाला इशारा

तहसीलदार विरसींग वसावे याना निवेदन देताना शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष डॉ . शेख व अन्य

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी

दिघी माणगाव पुणे या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे माणगाव - म्हसळा- दिघी  या मुख्य टप्प्यांत राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ महामार्गालगतच्या शेतकऱ्यांची  फसवणुक  करीत आहे ,संबधीत ठेकेदार जमीन भूसंपादन झाल्याचे कोणतेही पुरावे सादर न करता शेतकऱ्यांच्या जागेत बेदरकार पणे काम करीत आसल्याचा माणगाव - म्हसळा -श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा  म्हसळा तहसील कार्यालयावर आणला होता. यावेळी तहसीलदार विरसींग वसावे  व सपोनी प्रविण कोल्हे याना शेतकरी  संघर्ष संघटनेच्या वतीने  निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच अध्यक्ष डॉ. मुईज शेख , उपाध्यक्ष  ज्ञानदेव पवार , महादेव भिकू पाटील, नंदू शिर्के, नवनीत पारीख, कृष्णा म्हात्रे, फजल हळदे, नसीर मिठागरे, जनार्दन बुधे, बाबाजान पठाण, जहुर हुर्जुक, युनुस मेमन, अ. सलाम हळदे, अनंत कांबळे,शब्बीर बशारत आदी व अनेक शेतकरी उपस्थित होते. मोर्चेकरानी माणगाव दिघी रस्ता करण्यासाठी शासन व ठेकेदार हुकुमशाही पद्धतीने काम करीत आहेत. जमीन मालक, शेतकरी, बागायतदार याना अधीकृत कागदपत्र न दाखवताच धाकदपट शाहीने जागा ताब्यात घेत आहेत , जागा मालकाना योग्य मोबदला दिल्याशिवाय कोणीही जागा देऊ नये असे अवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ.शेख व अन्य पदाधिकाऱ्यानी यावेळी केले.


मोर्चा समोर  मार्गदर्शन करताना ज्ञानदेव पवार व अन्य


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा