म्हसळा तालुका भाजप युवामोर्चा अध्यक्ष शिवसेनेत...


म्हसळा : म्हसळा तालुक्यात रायगड जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर तसेच उपजिल्हा अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुसंडी मारत असताना म्हसळा तालुका भाजप युवामोर्चा अध्यक्ष प्रसन्ना निजामपुरकर यांनी शिवसेना नेते केंद्रीय मंत्री खासदार श्री . अनंत गीते यांच्या उपस्थितीत मुंबई येथील कार्यालयात शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे . श्रीवर्धन मतदार संघात गेल्या दोन महिन्यात विकास कामाच्या श्रेयवादावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा कलगी तुच्याचा सामना सर्व जनतेला बघायला मिळाला त्यातच भारतीय जनता पार्टी मध्ये जोरदार इनकमिंग चालू असताना भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्षांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने भाजपला म्हसळ्यात झटका मिळाला आहे यावेळी रवी मुंडे , सुजित तांदळेकर नंदू शिर्के , महादेव पाटील अनिल नवगणे , अनंत कांबळे , गजानन शिंदे , अनिकेत पानसरे , प्रविण पाहूकले , प्रवेश काजारे , मुकेश पवार अमित महामुनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते . 

1 Comments

  1. मा.गीते साहेबानि मुंबई ते इंदापूर या राज्यमार्गाकडे लक्ष्य द्यावे जेणेकरून जनतेला सोईचे होईल गेली 8 वर्ष हा रस्ता प्रलबीत आहे।

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा