"बॅ.ए.आर.अंतुले यांचा समाजासाठी त्याग अनन्य साधारण "
निकेश कोकचा - म्हसळा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोकणाचे भाग्यविधाते आणि गोरगरीबांचे स्वप्न स्व.बॅ.ए.आर.अंतुले यांचा जयंती सोहळा वसंतराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय म्हसळा येथे संस्थेचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या प्रसंगी रायगड जिल्हा कांग्रेस चे अध्यक्ष आर.सी.घरत,रायगड जिल्हा महिला कांग्रेस आघाडी अध्यक्षा श्रद्धा ठाकुर,डॉ.मुईज शेख,मुरुड तालुका कांग्रेस चे अध्यक्ष सुभाष महाडिक, जि.प.चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार,म्हसळा मुस्लिम समाज अध्यक्ष मोहमंद पेनकर,स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य फझल हालडे,खलिल काझी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुश्ताक अंतुले यांनी सांगितले की बॅ.ए.आर.अंतुले यांनी कधीही दुसऱ्या पक्षावर अगर कोणत्याही व्यक्तिवर टिका केली नाही,फक्त विकास हेच ध्येय समोर ठेऊन संपुर्ण कोकणाचा परिपूर्ण विकास केला आणि गरीब हाच विकासाचा केंद्र बिंदु मानले.महाड-पोलादपुर चे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी सांगितले की गरीबीचे चटके खाऊन गोर-गरीबांचे हित साधुणारे स्व.बॅ.ए.आर.अंतुले म्हणजे महाराष्ट्रातील एक महान शक्ति असल्याचे सांगितले.त्यांनी पुढे सांगितले की प्रतिकूल परीस्थितीत अत्यंत गरीबित दिवस काढून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न व जिद्द त्यांनी ठेवली आणि जिद्दीच्या जोरावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
बॅ.अंतुले यांनी कधीही खुर्चीवर प्रेम केले नाही मात्र खुर्चीचे महत्व निच्छितपणे वाढविले.संपुर्ण राज्यात विकासाचे जाळे पसरविणारा महाराष्ट्राचा एकमेव लोकनेता म्हणुन बॅ.अंतुले यांचा आजही नावलौकिक असल्याचे माणिक जगताप यांनी सांगितले.जोशी-मुंडे यांनी झुणका भाकर केंद्रे सुरु केली परंतु ती कधीच नाहीशी झाली.मात्र बॅ.ए.आर.अंतुले यांनी गरीबांचा विचार करून सुरु केलेल्या संजय गांधी निराधार योजना,पल्स पोलिओ योजना आजपर्यंत कोणालाही बंद करता आल्या नाहीत एवढी मोठी ताकत बॅ.अंतुले यांच्या निर्णयात प्रचंड ताकत असल्याचे माणिक जगताप यांनी सांगितले.केवळ पैशासाठी मेडिकल अगर इंजिनीअर ची कॉलेज न उघडता त्यांनी गरीब,ग्रामिण भागातील सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थी पदवीधर व्हावा हाच एकमेव उद्देश त्यांनी समोर ठेवला.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.राघव राव यांनी केले.
Post a Comment