म्हसळा तालुक्यात 16 कामांसाठी 95 लक्ष रुपयांचा विकास निधीची मंजुरी...

"म्हसळा तालुक्यात डोंगरी विकास योजने मधुन 16 कामांसाठी 95 लक्ष रुपयांचा विकास निधीची मंजुरी"
म्हसळा-वार्ताहर    
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष केंद्रात व महाराष्ट्र राज्यात सत्तेत नसला तरी आमचे केंद्रातील खासदार सुप्रिया ताई सुळे तसेच राज्यातील माजी मंत्री अजीतदादा पवार,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,सुनिलजी तटकरे,जितेंद्र आव्हाड आदि नेतेगण व आमदार खासदार  केंद्राचे व राज्याचे विधिमंडळात विरोधी पक्षाची भुमिका ठोसपणे  बजावत आहेत परंतु केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना व त्यांचे पदाधिकाऱ्यांना विकास कामे करण्यासाठी उपोषण व आंदोलन करावे लागत आहे हे कसले राजकारण असा उलट सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रायगड जिल्हा युवा नेते अनिकेत तटकरे यांनी म्हसळा तालुका माजी सभापती महादेव पाटील यांनी पक्षावर केलेल्या टिकेला आणि  पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला  उत्तर देताना सांगितले.आमचा पक्ष योग्य वेळी योग्य भुमीका बजावेल त्याची चिंता महादेव पाटील यांनी न करता त्यांनी आता सत्तेत असताना खड्ड्यांमध्ये झाडे लावणे किंवा उपोषण करण्यापेक्षा पक्षाचे आमदार,मंत्र्यांना भेटून विकास निधी आणावा असा उपदेश अनिकेत तटकरे यांनी केला.म्हसळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष नाझीम हसवारे यांचे कार्यालयात पत्रकार परिषदेत अनिकेत यांनी वार्तालाप करताना आम्ही राज्याचे  सत्तेत नसलो तरी पक्षाची भुमिका नेतेगण,आमदार आणि कार्यकर्ते योग्यपणे सांभालीत आहेत.आमचे नेते आमदार सुनिल तटकरे यांचे प्रयत्नाने तालुक्यात गाववाडी वस्तीच्या विकास कामांसाठी शासना कडुन भरघोस निधी आणत आहेत.म्हसळयातील 16 गावांचे कामांना महाराष्ट्र शासनाचे डोंगरी विकास निधीतुन सुमारे 95 लक्ष रूपयाचा निधी मंजुर केल्याचे शासन मान्यता पत्र अनिकेत तटकरे यांनी या वेळी जाहीर केले.या वेळी त्यांचे समावेत तालुका अध्यक्ष नाझीम हसवारे,उप सभापती मधुकर गायकर, नगराध्यक्ष कविता बोरकर,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,उपनगराध्यक्ष नासिर दळवी,नगरसेवक किरण गायकवाड,युवक अध्यक्ष फैसल गीते,पंचायत समिती सदस्य संदिप चाचले,जिल्हा अल्पसंख्याक सेलचे शाहिद उकये,श्रीवर्धन मतदार संघ युवक अध्यक्ष संतोष पाखड,गण अध्यक्ष जयवंत सावंत,अनिल बसवत,अक्रम साठविलकर,जलाल जहांगिर,मुस्स्धीक इनामदार,
  सतीश शिगवण,रमेश काणसे,अशोक विचारे,संतोष सावंत आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. अनिकेत यांनी अधिकपणे स्पष्ट करताना आमचे  
राष्ट्रवादी कॉँग्रेसची निर्मीती झाल्या पासुनच आम्ही राज्याचे सत्तेत होतो आता साडेतीन वर्षे सत्तेत नसलो तरी आमची रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद,अनेक तालुक्यांत पंचायत समिती,ग्राम पंचायती,नगर पंचायती व नगर परिषदेत सत्तेत असल्याने पक्षाचे कार्यकर्ते फारसा विरोधी भुमिका घेताना दिसत नाही हे जरी खरे असले तरी आमचे नेते आमदार सुनिल तटकरे यांचे प्रयत्नाने मतदार संघात सर्वकश विकास होत असल्याचे सांगितले.म्हसळा तालुक्यातील काळसुरी,कुडतुडी,गोंडघर,रोहिणी,पास्टि,सालविंडे ताड़वाडी,मरियम खार,संदेरी सातीम आळी,निगडी दगडघुम,तुरुंबाडी,मेंदडी कोळीवाडा,खरसई,पाभरे कुणबीवाडी,तोराडि बौद्धवाडी,जांभूळ बौद्धवाडी,मांदाटणे बौद्धवाडी या गावात 5,7,आणि 10 लक्ष रुपये खर्चाचे सामाजीक सभागृह बांधकामास मंजुरी मिळाली असल्याचे मंजुरी पत्र देवुन घोषीत केले.हि विकास कामांची पहीली यादी असुन बरीचशी कामे प्रस्तावित असल्याचे अनिकेत यांनी माहिती देताना सांगितले.मतदार संघातील म्हसळा,श्रीवर्धन,गोरेगाव,माणगाव या तालुक्यात बौद्धसमाजाचे भव्य बुध्दविहार असावे या साठी मी आमदार सुनिल तटकरे यांचे समावेत राज्याचे नागरी विकास मंत्री राजकुमारजी यांची भेट घेऊन प्रत्येकी 25 ते 30 लक्ष रुपये मंजुर करणार असल्याचे सांगितले.  

राज्याचे सत्तेत असणाऱ्यांना विरोधी पक्षाची भुमिका बजावावी लागत आहे ही नामुश्की,
राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्षाची भुमिका योग्य पणे बजावत आहे,
सत्तेत नसलो तरी जनहिताची  विकास कामे करीत आहोत -अनिकेत तटकरे
         


 मंजूर झालेल्या कामांची यादी

 

1 Comments

  1. सर बातमी सोबत जोडलेली कामांच्या मंजुरीची प्रत हि पुन्हा एकदा वेवस्थित स्कॅन करून किंव्हा नीट टाईप करून पुन्हा प्रसारित करावी कारण ती खूपच ब्लर आहे त्यामुळे ती वाचता येत नाही .. त्यामुळे कोणत्या गावांसाठीव कशासाठी किती रक्कम मंजूर झाली आहे ते माहिती पडेल कृपया याची नोंद घ्या..

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा