हिंदू
ग्रामस्थ मंडळ, म्हसळा कडून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी , ग्रामस्थ व
अधिकाऱ्यांचे म्हसळ्याच्या सुख समृद्धीसाठी दर्याला साकडे...
म्हसळा : सुशील यादव
नारळी पौर्णिमे निमित्त दर्याला नारळ अर्पण केल्यानंतर कोळी
बांधव मच्छीमारीसाठी समुद्रात उतरतात . ज्याप्रमाणे कोळी बांधव हा सण
उत्साहात साजरे करतात त्याचप्रमाणे समस्त कोकणातील हिंदू बांधव नारळी
पौर्णिमा हा सण तेवढयाच उत्साहात साजरे करतात . म्हसळा शहरवासीय देखील यात
मागे नाहीत .नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील हिंदू ग्रामस्थ व
शासकीय अधीकारी यांनी एकत्रीत रित्या नारळ अर्पण करून म्हसळ्याच्या सुख
समृद्धीसाठी दर्याला साकडे घातले . दरवर्षी म्हसळा शहरातील हिंदू ग्रामस्थ
मंडळ नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करते .सालाबादप्रमाणे याही
वर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त म्हसळा शहरातील शेकडोंच्या संख्येने हिंदू
ग्रामस्थ वाजत गाजत या कार्यक्रमात सहभागी झाले होते . प्रत्येक जण आपापला
नारळ घेऊन तो दर्याला अर्पीत करण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने या कार्यक्रमात
सहभागी झाला होता . सामान्य नागरीकांसोबतच म्हसळा तहसिल कार्यालयाचा नारळ
, पोलीस ठाण्याचा नारळ घेऊन तहसिलदार रामदास झळके व सहाय्यक पोलीस
निरीक्षक सुदर्शन गायकवाड हे देखील आपापल्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत या
कार्यक्रमात सहभागी झाले होते .
या कार्यक्रम प्रसंगी हिंदू ग्रामस्थ
मंडळाचे अध्यक्ष सुभाष करडे, उपाध्यक्ष नंदकुमार गोविलकर , सचिव सुशील यादव
, नायब तहसिलदार भांबरे ,महादेव पाटील , दिलीप कांबळे , अशोक काते, नंदू
सावंत , खंगारसींग रजपूत , योगेश करडे , गौरव पोतदार , बाबू शिर्के ,सचिन क
. करडे , समिर बनकर , आर्यशिल मोहीते , श्याम कराडे ,मंगेश म्हशिलकर, संजय
कर्णिक ,यतिन करडे ,प्रकाश करडे , निलेश करडे यांच्यासहीत नगरसेविका
संपदा पोतदार , टिना करडे , गौरी पोतदार , सरोज म्हशिलकर आदी भगिनी देखील
उपस्थित होत्या .

छाया : सुशील यादव

Post a Comment