म्हसळा: सुशील यादव
म्हसळा शहराचा दर्जा नगरपंचायत असतानाही, गॅस वितरण कंपनीच्या तांत्रिक प्रणालीमध्ये हे शहर 'ग्रामीण' म्हणूनच नोंदवले गेले आहे. या एका तांत्रिक चुकीमुळे म्हसळा शहरातील ग्राहकांना मोठा फटका बसत असून, याविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची दखल घेत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी गॅस कंपनीला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे नेमका वाद?
गेल्या१९ दिवसांपासून सुरू असलेल्या इराण विरुद्ध इस्रायल - अमेरिका युद्धामुळे संपूर्ण देशात LPG चा तुटवडा सुरूबाहे. त्यातच
गॅस कंपन्यांच्या नियमांनुसार, 'शहरी' आणि 'ग्रामीण' भागासाठी सिलिंडर बुकिंगच्या कालावधीत मोठी तफावत आहे:
शहरी भाग: नवीन सिलिंडर बुकिंगसाठी केवळ २५ दिवसांचा कालावधी अनिवार्य आहे.
ग्रामीण भाग: नवीन सिलिंडर बुकिंगसाठी तब्बल ४५ दिवसांचा कालावधी अनिवार्य आहे.
म्हसळा ही नगरपंचायत असूनही गॅस कंपनीच्या रेकॉर्डवर ती अद्याप ग्रामीण म्हणून दिसत असल्याने, येथील ग्राहकांना दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी दीड महिना वाट पाहावी लागत आहे. यामुळे शहरातील गृहिणींचे बजेट आणि नियोजनाचे पुरते बारा वाजले आहेत.
खासदार सुनील तटकरे यांची आक्रमक भूमिका
शहरातील नागरिकांचा वाढता संताप आणि गॅस एजन्सीसमोर निर्माण होणारे पेचप्रसंग पाहून खासदार सुनील तटकरे यांनी थेट संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
"म्हसळा हे शहर नगरपंचायत म्हणून कार्यरत असताना, गॅस कंपनीने त्याला ग्रामीण भागात धरून नागरिकांची अडवणूक करणे चुकीचे आहे. यामुळे होणारा ४५ दिवसांचा विलंब अन्यायकारक आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
तातडीने 'शहरी' दर्जा देण्याची सूचना
खासदार तटकरे यांनी म्हसळा शहरातील कादरी गॅस एजन्सीला (Kadari HP Gas Agency) तातडीने 'शहरी' (Urban) श्रेणीत समाविष्ट करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या आहेत. ही दुरुस्ती झाल्यास म्हसळकरांना आता २५ दिवसांत सिलिंडर बुकिंगची सुविधा उपलब्ध होईल, ज्यामुळे गॅस टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
Post a Comment