म्हसळा : सुशील यादव
टेलिग्राम टास्कच्या आमिषाने म्हसळा येथील एका नागरिकाला तब्बल १२,५३,१५३ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी कौशल्याने तांत्रिक तपास करत मोठी कारवाई केली असून, नालासोपारा येथून चार आरोपींना अटक केली आहे.
गुन्ह्याचा तपशील:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल वसंत पोतदार (रा. म्हसळा, ता. म्हसळा, जि. रायगड) यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे.
हा फसवणुकीचा प्रकार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या दरम्यान घडला.
आरोपींनी टेलिग्राम टास्कच्या माध्यमातून UPI आणि RTGS द्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वळते केले.
एकूण १२,५३,१५३ रुपयांच्या फसवणुकीपैकी ५,९८,६९२ रुपये आरोपी क्रमांक १ (रोहीत गमरे) याच्या बँक खात्यावर जमा करून लंपास करण्यात आले आहेत.
याप्रकरणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १४:३० वाजता म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ८७/२०२५) दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी फरार होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्यांचे पत्ते, मोबाईल नंबर आणि बँक खाती शोधून काढत त्यांना शिताफीने अटक केली. दिनांक १९ मार्च २०२६ रोजी रात्री २०:०८ वाजता खालील चार आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत:
१. रोहीत संजय गमरे (वय ४० वर्षे, रा. मोरेगाव, नालासोपारा ईस्ट, पालघर)
२. रोशन आनंद सिंग (वय २५ वर्षे, रा. ओमनगर, नालासोपारा ईस्ट, पालघर)
३. अंकीत विरेंद्र विश्वकर्मा (वय २३ वर्षे, रा. मोरेगाव, नालासोपारा ईस्ट, पालघर)
४. वृषभ बबन जाधव (वय २६ वर्षे, रा. मोरेगाव, नालासोपारा ईस्ट, पालघर)
तसेच या गुन्ह्यात अनुज सिंग (रा. प्रगतीनगर, नालासोपारा ईस्ट, पालघर) आणि जोरा राम (रा. बलोत्रा, जि. बारमेर, राजस्थान) हे दोन आरोपी देखील निष्पन्न झाले आहेत.
पोलिसांची चमकदार कामगिरी:
सदर गुन्ह्याचा तपास श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सह-तपासी अधिकारी) रविंद्र पारखे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक शिवथरे आणि श्रीवर्धन विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत तपास पथकातील पोलीस नाईक पालोदे (२३४०), पोलीस शिपाई चितारे (२१०५) आणि पोलीस शिपाई ठाकरे (११४१) यांनी मोलाची कामगिरी बजावली
Post a Comment