कौतुकास्पद ! ​चार वर्षांच्या ओजसने मैदानावर मारली बाजी; पटकावले सुवर्ण आणि रौप्य पदक




​म्हसळा: सुशील यादव 

​श्रीवर्धन येथील कुणबी समाज हॉल येथे नुकतेच 'चॅम्पियन्स कराटे क्लब' तर्फे राज्यस्तरीय शिवछत्रपती चषक २०२५ कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अवघ्या चार वर्षांच्या ओजस समीर दिवेकर याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एक सुवर्ण आणि एक रौप्य (सिल्व्हर) पदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
​  चॅम्पियन्स कराटे क्लब, श्रीवर्धन, रायगड यांनी ही स्पर्धा आयोजीत केली होती.
 संपूर्ण राज्यातील ८ जिल्ह्यांमधून सुमारे १५० स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.
​  आगामी राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धांच्या तयारीसाठी ही स्पर्धा खेळाडूंसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.
​ओजसचे कौतुकास्पद यश:
​रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीवर्धन टीमला या स्पर्धेत 'सर्वोत्कृष्ट टीम' म्हणून घोषित करण्यात आले. या टीममधील सर्वात लहान खेळाडू असलेल्या ओजस समीर दिवेकर याने एवढ्या लहान वयात दोन पदके जिंकून आपल्या क्लबचे नाव उज्ज्वल केले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
​ही स्पर्धा शिहान संतोष मोहिते सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मुख्य प्रशिक्षक अविनाश मोरे, प्रसाद विचारे, रितेश मुरकर आणि अनिकेत साखरे यांच्या चोख नियोजनामुळे 'शिवछत्रपती चषक २०२५' अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
​प्रत्येक गटातील उत्कृष्ट खेळाडूंना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा