न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
म्हसळा: सुशील यादव
महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त (पोलीस रायझिंग डे) म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहितीच घेतली नाही, तर विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभवही घेतला.
३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिवसाचे महत्त्व विशद केले. तसेच, पोलीस खात्यातील विविध पदे, त्यांची कर्तव्ये आणि 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या पोलीस ब्रीदवाक्याचा अर्थ विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला.
विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने पारखे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांविषयी माहिती दिली, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पोलीस दलातील शस्त्रांचे प्रदर्शन. या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना विविध शस्त्रे जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये:एस.एल.आर. पिस्तूल ,कार्बाईन ,
क्शन पंप मशीन अशा विविध प्रकारच्या बंदुकांचा समावेश होता. मंचावर ठेवलेली ही शस्त्रे पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि उत्साह स्पष्ट दिसत होता.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. आर. पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र पारखे व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले आणि पोलीस रायझिंग डे च्या शुभेच्छा दिल्या.
Post a Comment