विनयभंगप्रकरणी आरोपीस सक्तमजुरी


श्रीवर्धन | प्रतिनिधी 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली असून, पंधराशे रुपये दंडदेखील केला आहे. या प्रकरणातील फिर्यादी पीडित बालिका ही आरोपीची अल्पवयीन मुलगी आहे. हे आरोपी याला माहिती असताना त्याने तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला राहते घरात रात्रीचे वेळी बळजबरी करून, अश्लील चाळे करून, मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला मारहाण केली होती.

याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची फिर्याद पोलिसांनी घेतली होती. या गुन्ह्याचा तपास के.एस. गावडे पोलीस उपनिरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे यांनी केला होता. आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर घटनेची सुनावणी विशेष न्यायालय माणगाव येथे झाली असता, सदर गुन्ह्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाचा पुरावा ठरली. या खटल्यामध्ये अतिरिक्त शासकीय अभियोक्ता योगेश अवधूत तेंडुलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्याय निर्णय दाखल केले. या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी अनंत पवार, शशिकांत कासार, छाया कोपनर व पोलीस हवालदार शशिकांत गोविलकर यांनी सहकार्य केले. मा. विशेष व सत्र न्यायाधीश यू.टी. पोळ यांनी सदर घटनेतील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व पंधराशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा