SNM : खरसई येथे धरण नदी परिसरात राबविण्यात आले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान


संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत”चे देशभरात आयोजन


जल परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करावे. 
   -सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज

सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली रविवारी सकाळी 8.00 वाजता ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितिय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई. टी. ओ, दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीच्या प्रेरणेतून साकारलेली ही परियोजना भारतवर्षातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील 1533 ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली ज्यामध्ये 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला. 
प्रोजेक्ट अमृत अंतर्गत “स्वच्छ जल – स्वच्छ मन” ही परियोजना खरसई येथे धरण नदी परिसरात  राबविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये  खरसई (रायगड) ४०- अ चे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे, खरसई सेवादल युनिटचे सर्व सेवादल अधिकारी, निलेश मान्दाडकर (माजी सरपंच), नजीर जहांगीर (उपसरपंच), महादेव नाकती (गाव अध्यक्ष) रामदास कांबळे ( माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष) कानुबुवा शीतकर, यशवंत पयेर व संपूर्ण म्हसळा तालुक्यातील  निरंकारी सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य तसेच अन्य निरंकारी भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.  सरकारी अधिकारी, प्रतिष्ठित नागरीक व जनसामान्यांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. 
दिल्ली येथे ‘प्रोजेक्ट अमृत’च्या द्वितिय टप्प्याच्या आयोजन प्रसंगी निरंकारी राजपिता रमितजी यांनी सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनापूर्वी आपल्या संबोधनामध्ये म्हटले, की बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या जीवनात आम्हाला हीच प्रेरणा दिली, की सेवा ही निष्काम भावनेनेच व्हायला हवी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रशंसेची इच्छा नसावी. आपण स्वत:चे आंतरिक परिवर्तन घडवून आणण्याकडे लक्ष केंद्रीत केले तर त्यातून समाज व जगाचे परिवर्तन घडून येऊ शकेल. खरं तर स्वच्छ आणि निर्मळ मनातूनच सात्विक परिवर्तनाचा उगम होतो. 
सदगुरू माताजींनी “प्रोजेक्ट अमृत” प्रसंगी उपस्थित सेवादार व समाजातील विविध घटकांतून आलेल्या प्रतिनिधिंना संबोधित करताना आपल्या पावन आशीर्वचनामध्ये सांगितले, की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे, जल हे अमृतासमान होय. जल आपल्या जीवनाचा मुलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला ही जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहाल केली आहे तिची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे. मानवी रूपातच आपण या अमूल्य अमानतीचा दुरुपयोग करुन ती प्रदूषित केली आहे. आपण प्रकृतीला तिच्या मूळ रुपात प्रतिष्ठापित करुन तिची स्वच्छता करायला हवी. हे आपण आपल्या कर्मातून सांगायला हवे केवळ शब्दांतून नव्हे. कणाकणात व्याप्त परमात्म्याशी जेव्हा आपले नाते जोडले जाते आणि आपण याचा आधार घेऊ लागतो तेव्हा याच्या रचनेवरही आपले प्रेम जडते. आपण या जगात आलो आहोत तर या धरतीला आणखी सुंदर रुपात सोडून जाण्याचा आपला प्रयास असायला हवा.
  यमुनेच्या तिरावर आयोजित मुख्य कार्यक्रमात ‘आओ संवारे, यमुना किनारे’ (चला सावरू यमुनेचे तीर) या मुलभूत संदेशातून या परियोजनेने एक जनजागृतीचे रूप धारण केले. या प्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक व सेवादलचे सदस्य सहभागी झाले.  कार्यक्रमाचे थेट प्रसारण संत निरंकारी मिशन की वेबसाईटवर करण्यात आले ज्याचा लाभ देश-विदेशातील भाविक भक्तगणांनी घेतला. या कार्यक्रमात दिल्ली विश्वविद्यालयातील हजारो विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित अनेक मान्यवर अतिथींनी भाग घेतला. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे प्रतिनिधिही या कार्यक्रमात सहभागी झाले. 
कार्यक्रमाचे समापन झाल्यानंतर सहभागी झालेल्या अतिथीगणांनी मिशनची अत्यधिक प्रशंसा केली आणि सद्गुरु माताजींचे मनापासून आभार व्यक्त करत प्रकृती रक्षणार्थ निश्चितपणे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे, अशी पुस्तिही जोडली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा