श्रीवर्धन आगारावर श्रीगणेशाची कृपा ; तीन दिवसात एकतीस लाख चौतीस हजाराचे उत्पन्न : परतीच्या गाड्यांचा साडेसात हजार प्रवाशांनी घेतला लाभ.
श्रीवर्धन(समीर रिसबूड)
गौरी-गणपतीसाठी आपापल्या गावी आलेल्या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासावेळी गैरसोय होऊ नये या करिता श्रीवर्धन आगाराकडून मुंबई,बोरीवली व नालासोपारा या शहरांकडे तीन दिवसात एकुण एकशे सेहेचाळीस जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.तालुक्यात एस.टी.गाड्यांचे दोन दिवसात विक्रमी त्रेहात्तर गाड्यांचे ग्रुप बुकींग झाले.तीन दिवसात आरक्षण गाड्या एकोणसत्तर व दोन दिवसात विना आरक्षण चार गाड्या सोडण्यात आल्या.
श्रीवर्धन तालुक्यातील ७८ गावातील साडेसात हजार प्रवासीवर्गाने राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.गाडीचा लाभ घेतला.दर पंधरा ते वीस मिनीटांनी मार्गस्थ होत असलेल्या गाड्यांची आसन स्वच्छता,प्रवासीवर्गाचा प्रवास हा सुखकर व्हावा ह्या कारणाने प्रत्येक गाडी आतुन फिनेलचा वापर करीत स्वच्छ धुण्यात आली होती.प्रत्येकी बेचाळीस आसन क्षमता असलेल्या गाड्यांना मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते.श्रीवर्धन आगाराचे तीन कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आले होते तसेच फलाटावर आलेल्या गाड्यांबाबत ध्वनिक्षेपकावरुन सुचना करण्यात येत होत्या.प्रवाशांना त्यांचे आरक्षित आसन दाखवणे,मार्गस्थ होत असलेल्या गाड्यांचे मार्ग समजावून सांगणे इत्यादी सेवा कर्मचार्यांकडून केली गेली.
दि.२४ सप्टेंबर २०२३.
ग्रुप बुकिंग-६५
आरक्षण-३४
विना आरक्षण-०२
दि.२५ सप्टेंबर २०२३.
ग्रुप बुकिंग-०८
आरक्षण-२६
विना आरक्षण-०२
दि.२६ सप्टेंबर २०२३
आरक्षण-०९
श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासीवर्गाकडून जादा गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. चौवीस, पंचवीस व सव्हीस या तीन दिवसात साडेसात हजार प्रवाशांनी एस.टी. ने प्रवास केला. तीन दिवसात आगाराला एकतीस लाख चौतीस हजाराचे उत्पन्न मिळाले. विभाग नियंत्रक दीपक घोडे व यंत्र अभियंता पंकज ढावरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन आम्हाला उपयुक्त ठरले. -महिबूब मणेर.श्रीवर्धन आगारप्रमुख.
श्रीवर्धन आगाराचे ह्यावेळी गाड्यांबाबत नियोजन चांगले होते.अधेमधे कुठेही थांबे नसल्याने प्रवास आनंनदायी झाला.राज्य परिवहन महामंडळाने ग्रुप बुकींग सुविधा उपलब्ध केल्याने आम्हाला ही या सुविधेचा लाभ घेता आला.गाड्यांची बाॅडी कंडीशन ही चांगली होती.
-निरंजन चौलकर.प्रवासी.श्रीवर्धन
Post a Comment