Mahavitran Tala : तळ्यामध्ये होणार अखंडितवीजपुरवठा ; १८कोटींच्या भूमिगत विजवाहिनीच्या प्रकल्पाला मंजुरी.


महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश.

तळा :किशोर पितळे:कोंकण आपत्ती प्रकल्पा अंतर्गत कामाचे नियत वाटप आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडील शासननिर्णयदि.१४.९.२०२३ तळा शहर येथे भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे यासाठी १८,४७,१९००० रुपयांचा निधी मंजूर झाला असून यासाठी महिला बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या तळा‌ शहराचा वीजपुरवठा खंडित होणे हे पाचवीलाच जणू पुजलेले; पण हे दैन्य संपणार आहे. वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येत असल्याने हा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे १२ कोटी ४७ लाख रुपये आहे. तळा शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होणे हा प्रश्न अग्रस्तानी आहे. सोसाट्याचा वारा, चक्रीवादळामुळे रहिवाशांना तासंतास अंधारात राहण्याची वेळ येते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी तळा शहरात भूमीगत वीज वाहिन्यांचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. चक्रीवादळ येणाऱ्या संभाव्य परिसरात चक्रीवादळामुळे कमीत कमी हानी होण्यासाठी योग्य सशक्त पायाभूत सुविधा राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वीज वाहिन्यांचे काम तळा शहरासाठी मंजूर झाले असल्याची माहिती आहे या प्रकल्पात शहराला वीज पुरवठा करणाऱ्या क्षमतेत वाढ होणार असून उच्चदाब व लघुदाब अशा २रोहित्रांना मान्यतामिळाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा सुरळीत होणार आहे ही कामे वेगाने पूर्ण केली जातील असा नागरिकांना विश्वास असूनतळेवासियांनी महिला बालकल्याण मंत्री ना. अदितीतटकरे यांचे व‌ महावितरणाचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा