मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेव्या चौदा वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर टप्प्याबाबत “जागर आरतीचा आणि शक्ती तुऱ्याची जुगलबंदी” आंबेवाडी नाका कोलाड येथे अभिनव आंदोलन पुकारले. या आंदोलनाला कोलाड विभाग काँग्रेस कमिटीतर्फे पाठिंबा देण्यात आला .व कमिटीने पत्रकार परिषदेच्या आंदोलनात सहभाग नोंदवला .त्यावेळी पाठिंबा पत्र रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष मनोज खांबे,पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, भारत गोरेगावकर,विश्वजीत लुमण यांनी स्विकारले यावेळी कोलाड विभाग काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरिओम टाळकुटे, किल्ले गावं काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंगेश जाधव ,उपाध्यक्ष दिनेश जाधव ,सेक्रेटरी लक्ष्मण पवार ,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण हिलम ,नितिन कोळी, खोंड्याची वाडी काँग्रेस कमिटी सेक्रेटरी विनायक कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
या आंदोलनावेळी गणरायाची आरती करुन पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांनी रखडलेल्या रस्त्याने पिडित झालेल्या,हालअपेष्टा सोसत असलेल्या कोकणी माणसांच्या व्यथांचे गाऱ्हाणे घातले .नंतर शाहिर नितिन पवार यांनी त्यांच्या पथकासोबत कोकणच्या मातीतले अस्सल पारंपारिक लोकनृत्य ज्याला जाखडी नृत्य संबोधले जाते ते सादर करुन कोकणी माणसाच्या सहनशीलतेला शाहीरांनी वाचा फोडली
Post a Comment