फोटो-श्री संत सेना महाराज यांच्या ६६८ व्या पुण्यतिथी निमित्त सकलप येथील जेष्ठ समाज बांधव नथुराम पवार यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या कार्यक्रमास संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना समाज बांधव .(छाया-उदय कळस)
उदय कळस
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सोबत जे अठरा पगड जातीचे संत झाले त्यापैकी एक महान संत म्हणून श्री संत सेना महाराज यांचा समावेश आहे.संत सेना महाराजांनी भक्ती मार्ग अनुसरला आणि विरल नामाच्या साधनेने संत सेना महाराजांनी परमेश्वराचे दर्शन प्राप्त करून घेतले.संसारात राहून आणि आपापल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी समाज मनाचे दर्शन घडऊन रूपकात्मक अभंगातून समाजाला उत्तम असा उपदेश दिला.अश्या या थोर संतांची ६६८ वी पुण्यतिथी कुटुंबाच्या माध्यमातून दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी म्हसळा तालुका नाभिक समाजाचे जेष्ठ समाज बांधव आणि समाजसेवक नथुराम पवार( रा. सकलप )यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. रुपेश पवार यांच्या हस्ते विधिव्रत संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांना प्रसाद आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी पंचक्रोशीचे अध्यक्ष सुशील यादव,विलास मधुकर यादव माजी अध्यक्ष प्रदिप महादेव कदम ,म्हसळा शिवसेना उपशहर प्रमुख दिपल शिर्के, घनश्याम कदम, मंगेश अशोक कदम, सदाशिव साळुंखे, महिला उपाध्यक्ष सौ. जोशीला खराडे, महेश खराडे, अमोल कदम, रजनी जाधव, शोभा कदम संदीप जाधव, वैभव जाधव, दत्तात्रेय जाधव, तालुका महिला मंडळ सदस्या आदि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment