श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात आयुष्मान भव मोहिमेचा उद्घाटन सोहळा संपन्न.


श्रीवर्धन(समीर रिसबूड)

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी आयुष्मान भव मोहिम दिनांक १३ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येत असुन या अनुषंगाने बुधवार दि.१३ रोजी दुपारी तीन वाजता श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालय आयुष्मान भव मोहिमेचा उद्घाटन सोहळा नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के यांच्या हस्ते संपन्न झाला.

           आयुष्मान भवःमोहिमेबद्दल माहिती देताना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ.सुचीता गोरे यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधे आयुष्मान भव मोहिम राबविण्यात येणार असून गावपातळीपर्यंत गुणवत्ता पुर्वक आरोग्य सेवा पुरवीणे तसेच जनजागृती करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.मोहिमेत आयुष्मान आपल्या दारी ३.० आयुष्मान सभा,आयुष्मान मेळावा,अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी,रक्तदान मोहिम,अवयवदान जागृती मोहिम,स्वच्छता मोहिम,वय वर्षे अठरा वरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहिम उपक्रम राबविण्यात येणार आहेत.सतरा सप्टेंबर ते दोन आक्टोबर या कालावधीत आयुष्मान भव सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.आयुष्मान आपल्या दारी अंतर्गत पात्र लाभार्थीचे आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण,स्वंय नोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहीत करणे,प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे संयुक्त कार्डाचे वितरण करण्यात येईल.

         यावेळी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डाॅ.महेंद्र भरणे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.दिपक पांडे,डाॅ.कौस्तुभ केळस्कर,डाॅ.प्रफुल्ल पावशेकर,डाॅ.सलीम ढलाईत,डाॅ शुभम शेळके तसेच उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका,मदतनीस व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सापटे यांनी केले. 


टि.बी.चॅम्पियन गणेश खळे व सिध्देश भोईनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच कल्पना मधुकर थळे आणि सुबोध रविंद्र चांदोरकर यांचा राष्ट्रीय क्षययोग दुरीकरण कार्यक्रमात प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवणे करिता मोलाचे योगदान दिल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन व आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत निक्षय मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम समारोपावेळी उपस्थितांनी अवयवदानाची प्रतिज्ञा घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा