MNS Raigad : रायगड मधील सर्व निवडणुका स्वबळावर ; मनसे नेते संदीप देशपांडे यांची दिवेआगर येथे घोषणा

श्रीवर्धन प्रतिनिधी 

येणाऱ्या लोकसभेपासून ग्रामपंचायतींपर्यंतच्या सर्व निवडणुका मनसे स्वबळावर लढवू इथल्या प्रस्थापितांना धडा शिकवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असा इशारा मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी दिला. दिवेआगर येथे संपन्न झालेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
प्रथमेश फनलँड रिसॉर्ट येथे संपन्न झालेल्या श्रीवर्धन तालुका संवाद मेळाव्यास मनसैनीकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक उपजिल्हाध्यक्ष मृदास तोंडलेकर यांनी केले. यावेळी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष सुबोध जाधव, संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे, ठाणे शहर अध्यक्षा समीक्षा मार्कडे, तालुकाध्यक्ष सुशांत पाटील, सुनील रिकामे, सुमित सावंत हे पदाधिकारी उपस्थित होते.

संदीप देशपांडे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील एकापाठोपाठ एक बंद होत चाललेल्या जिल्हा परिषद शाळांबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली. खा. सुनील तटकरेंना त्यांच्या खाजगी शाळा श्रीवर्धन तालुक्यात सुरू करायच्या आहेत म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा घाट घातला जातोय, असा आरोपही त्यांनी केला. श्रीवर्धन मतदारसंघात इतकी वर्षे तुम्ही सत्ता उपभोगताय पण श्रीवर्धन तालुक्यात सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालय तुम्ही उभारू शकतं नाही. अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी शहरात पाठवायला लागतय, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. कोकणवासीयांना पक्ष फसवण्याचे काम करीत आहेत. इथल्या जमिनी अल्प दरात घ्यायच्या व वाढीव भावाने विकायच्या. हे खासदार, आमदार आहेत की जमिनींचे दलाल असा प्रश्न पडतो. असा सवालही केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा