काळसुरीच्या 'देवराम होना डावखर' सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार...


समाजात अनेक लोक अनेक पद्धतीने,अनेक प्रकारे   देशसेवा करीत असतात.अनेक पेशे हे शुद्ध व्यावसायिक असतात तर अनेक लोक पेशाने शिक्षक असतात.हे सर्वात चांगले नोबल मानले जाणारे क्षेत्र आहे.आणि खरोखरंच देशासाठी विद्यार्थी घडवण्यात जो आत्मिक समाधान आहे त्याची कल्पना इतरांना येणे अशक्य.तो ज्या पद्धतीने काम करतो ते पाहूनच अनेक सामाजिक संस्था अशा कर्मकुशल शिक्षकांचा गौरव करत असतात.

        असेच एक कर्तबगार शिक्षक म्हणजे 'देवराम होना डावखर सर' हे होय! नुकताच त्यांना अविष्कार फौंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.१६ सप्टेंबरला महाड येथील  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हाॅलला भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.कार्यक्रमास आमदार भरतशेठ गोगावले यांची विशेष उपस्थिती होती.

      रायगड जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात आपले कर्तव्य पार पाडणार्‍या देवराम डावखर सर म्हणजे एक कार्यकुशल विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.म्हसळा तालुक्यातील 'काळसुरी'सारख्या दुर्गम भागात को.ए.सो.शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत गेल्या जवळजवळ एका तपापासून आपली सेवा बजावत आहेत.तेरा वर्षांच्या या खडतर काळात आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक म्हणून ख्याती प्राप्त झाली.क्रीडाविषयात विद्यार्थी घडवित गेल्या  अनेक वर्षांपासून कबड्डी,खो-खो आणि  तालुका स्तरीय,जिल्हा स्तरीय आणि विभागीय व राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये आपला विशेष सहभाग नोंदवला आणि या वर्षीही ही परंपरा कायम राहील यात शंका नाही.

       आपल्या विषयावर प्रभुत्व असणारे आणि सर्वांशी खेळीमेळीने राहणारे डावखर सर हे मित्र प्रिय आणि समाजप्रिय शिक्षक आहेत.सदैव विद्यार्थ्यांच्या मदतीस धावून जाणारे डावखर सर,मित्रपरिवारात रमणारे डावखर सर,शाळेसाठी सदैव प्रयत्नशील असे डावखर सर हे शिक्षणक्षेत्रातील एक सळसळते तरूण रक्त आहेत.त्यांच्या हाती विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित आहे याचे  समाधान आहे अशी भावना समाजाची आहे.

       काळसुरी गाव आणि त्यांच्या शाळेसाठी ही बाब निश्चितच गौरवास्पद  आहे.यासाठी देवराम डावखर सरांचे समाजातील सर्व थरातून कौतुक होत आहे.शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी,स्थानिक समितीचे सर्व पदाधिकारी,पंचायत समिती म्हसळा,शिक्षण विभाग आणि मित्र परिवार व पालक वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.यापुढे ही असेच उदंड यश मिळो ही सदिच्छा व्यक्त केली जात आहे.तालुका क्रीडा समितीचे सर्व पदाधिकारी,शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे अध्यक्ष हे स्वतः डावखर सर हेच आहेत.संघटनेचे इतर सर्व पदाधिकारी,रायगड जिल्हा रायफल शूटिंग संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील शिक्षक मित्र सर्वजण आनंद व समाधान व्यक्त करत आहेत.भविष्यात असेच यश व मान लाभो हीच सदिच्छा!


शब्दांकन , झाकीर हुसेन हलसंगी

मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल पांगळोली,ता.म्हसळा रायगड

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा