Mhasla Nagradhyaksh : नगराध्यक्ष पदासाठी संजय कर्णिक यांचाएकमेव अर्ज ; निवडणूक बिनविरोध होणार.


आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत म्हसळा नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी संजय कर्णिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार.
म्हसळा-रायगड 
म्हसळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष असहल कादिरी यांनी त्यांचे नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने जिल्हाधिकारी रायगड डॉ.योगेश यांनी नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम दिनांक २१ सप्टेंबर रोजी घोषीत केले नुसार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी नाम निर्देशन पत्र दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी गटनेते संजय प्रभाकर कर्णिक यांचा आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे.नगरअध्यक्ष पदाचे निवडीसाठी एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.संजय कर्णिक यांना नगराध्यक्ष पद जाहीर करण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.दिनांक २९ सप्टेंबर रोजी निवडणूक निकाल घोषीत करण्यात येणार आहे.अर्ज दाखल करते वेळी पोलिस निरीक्षक संदीपान सोनावणे,नगर पंचायत अधिकारी दिपाली मुंडये,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती महादेव पाटील,माजी सभापती नाझिम हसवारे,प्र.नगराध्यक्ष संजय दिवेकर,माजी नगराध्यक्ष असहल कादिरी, माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,शहर अध्यक्ष रियाज घराडे,रफिक घरटकर,शाहीद उकये,भाई बोरकर,चंद्रकांत कापरे,मुबीन हुर्जूक,सूहेब हळदे,मंगेश म्हशिलकर,माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे,महीला शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,नगरसेवक निकेश कोकचा,शाहीद जंजीरकर,सभापती सूमैया आमदनी,नगरसेविका सरोज म्हशिलकर,नौसिन चोगले,फरहिन बशारत,जबीन दळवी, सारा म्हसलाई,वृषाली घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.म्हसळा नगर पंचायतीमध्ये १७ पैकी १३ नगर सेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन शिवसेना उबाठा गट तर दोन कोंग्रेसचे असे संख्याबळ आहे.नगर पंचायतीमध्ये एक हाती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने सर्व साधारण जागेसाठी नगराध्यक्ष पदासाठी  खासदार सुनिल तटकरे यांनी सुरुवातीला म्हसळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पदाचा बहुमान असहल कादिरी यांना दिला होता.असहल कादिरी यांनी त्यांचे दीड वर्षाचे कार्यकाळात पदाला शोभेल असे कर्तव्य बजावत नागरिकांची शाबासकी मिळवली आहे.त्यांचे पदाचा कार्यकाळ पूर्ण झाले असल्याने त्यांचे रिक्त जागी ग्रामपंचायत ते नगर पंचायतीमध्ये दीर्घकाळ कार्यरत असलेले अनुभवी लोकप्रतिनिधी गटनेते संजय कर्णिक यांची खासदार सुनिल तटकरे यांनी वर्णी लावली आहे.संजय कर्णिक यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार असल्याचे सुरवातीलाच पक्षाचे वतीने शब्द देण्यात आला होता त्याची अंमलबजावणी आता यशस्वी होताना दिसत आहे.दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी नगर अध्यक्ष पदाची निवडणुकीचा निकाल घोषीत करण्याचे दिवशी संजय कर्णिक यांची निवड बिनविरोध घोषीत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा