टीम म्हसळा लाईव्ह
म्हसळा : नगराध्यक्ष असहल कादिरी यांचा कार्यकाळ संपल्याने म्हसळा नगर पंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा संजय दिवेकर यांच्याकडे आली आहे.
कार्यकाळ संपल्यानंतर कादरी यांचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला. म्हसळा नगर पंचायतीमध्ये नव्याने नगराध्यक्षपदाची निवड होईपर्यंत प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा विद्यमान उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांच्याकडे राहणार असल्याचे आदेश राजीनामा पत्रात दिले आहेत. नगर पंचायतीवर एक हाती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पहिल्या टप्प्यातील नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी असल्याने खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवातीला म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा बहुमान असहल कादिरी यांना दिला होता. कादिरी यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात पदाला शोभेल, असे कर्तव्य बजावत नागरिकांची शाबासकी मिळवली. कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या रिक्त जागी नगर पंचायतीमध्ये दीर्घकाळ कार्यरत असलेले अनुभवी लोकप्रतिनिधी गटनेते संजय कर्णिक यांची खासदार सुनील तटकरे वर्णी लावणार असल्याचे समजते.
Post a Comment