तांबडी ग्रामस्थांचा शिवसेनेत भव्य जाहिर पक्ष प्रवेश ; वानस्ते-केळशी संगम बस थांबा उद्घाटन.



तळा : किशोर पितळे
तळा तालुक्यातील भानंग ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी गावातील मुंबईकर मंडळी व ग्रामस्थ महीला मंडळ यांनी महाड पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या झंझावात विकास कामांवर प्ररित होऊन जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,संपर्क प्रमुख अरूण चाळके दक्षिण रायगड महिला जिल्हा प्रमुख नीलिमाताई घोसाळकर युवा जिल्हाप्रमुख विपुल उभारे उपजिल्हा प्रमुख भास्कर गोळे तसेच तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ तळा शहर प्रमुख राकेश वडके यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्याकारभाराला कंटाळून आज शिवसेना शिंदे गटामध्ये श्रीगणेशाला वंदन करुन त्याच्या साक्षीने पक्षप्रवेश केला व तांबडी सामाजिक सभागृह व रस्त्याच्या विकास कामाचे उद्घाटन व तालुक्यातील वानस्ते-केळशी संगम एस टी बस थांबा शेडचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबडी येथील सामाजिक सभागृह व रस्त्याचे उद्घाटन समारंभ करण्यात आला. तळा तालुक्यात शिंदे गटाचे विकास कामाची विविध माध्यमातून विकासाची गंगा वाहत असल्यामुळे अनेकठिकाणचे पक्ष प्रवेशआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहेत त्यामुळे शिवसेना पक्षाचे प्राबल्य तालुक्यात वाढताना दिसत आहे.यापुर्वी तारास्ते, खांबोली,वानस्ते अशा गावांचा पक्ष प्रवेश कार्यप्रणालीवर विश्र्वास ठेवून झालाआहेत्यापाठोपाठ आज तांबडी ग्रामस्थांनी पक्षप्रवेशकरून अडीचशे ते तीनशेलोकांनीजाहीर प्रवेशकरूनस्वार्थीराजकारणाची राष्ट्रवादीवर असणारी नाराजी व्यक्त केली. बाळासाहेबाची शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा हा एकमुखाने निर्णय घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री मान. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेगवान कार्यपद्धतीवरती विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून राष्ट्रवादीला मोठी चपराक दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील शिंदे गटाचा वर्चस्व वाढत आहे त्यामुळे तालुक्यातली राष्ट्रवादी स्वार्थी राजकारणात खिळखिळी बनत चालली आहे. सदर कार्यक्रमाला शिवसेना दक्षिण रायगड संपर्क प्रमुख अरुणजी चालके दक्षिण रायगड प्रमुख  प्रमोदजी घोसाळकर दक्षिण रायगड  महिला जिल्हा प्रमुख.निलीमा ताई घोसाळकर,युवासेनाजिल्हाप्रमुख  विपुलजी उभारे युवासेना उपजिल्हाप्रमुख भास्कर गोळे जिल्हा कोअर कमिटी  लिलाधर खातु  तालुका प्रमुख, प्रदुम्नशेट ठसाळ,शहरप्रमुख राकेश शेट वडके संपर्क प्रमुख ॲड चेतन चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख अनंत खराडे ,नगरसेवक नरेश सुर्वे नगरसेवक ‌ सिराज खाचे भांनग सरपंच रघुनाथ वाघरे.रमेश तांदळेकर, संदीप दळवी, दिपक चिंचाळकर,संतोष वाघरे,विठोबाचांडिवकर मामा,महेश(बंडया) महाडकर व इतर पदाधिकारी शिवसैनिक तांबडी अध्यक्ष उत्तम पोटले, उपाध्यक्ष अजय चोरगे उपसरपंच सुहानी भौड रमेश सुद,सुनिल भौड महिला‌‌ अध्यक्षा ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई मंडळ व युवक मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा