प्राथमिक शाळांत खरसई मराठी तालुक्यात क्रीडा मध्ये अव्वल स्थानी




सांघिक खेळात ३६ प्रमाणपत्रे  , वैयक्तिक खेळात १६ प्रमाणपत्रे मिळवण्यात यश


म्हसळा प्रतिनिधी - अंगद कांबळे 


म्हसळा - रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा खरसई मराठी (मॉडेल स्कूल) नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी क्रिडा स्पर्धा प्राथमिक शाळा गटांत अव्वल स्थानी रहाण्याचे यशस्वीरीत्या प्रयत्न केलेला आहे. यावर्षी सांघिक खेळ कबड्डी, खोखो, योगासने, बुध्दिबळ, रिले, वैयक्तिक खेळ धावणे, थाळी फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, आर्चरी (कंपाऊंड), कुस्ती (फ्रीस्टाईल), योगासने ( रिदमिक/आर्टिस्टीक) इत्यादी खेळात मुले, मुली दोन्ही गटांत शाळेतून ४० खेळाडू तालुका व जिल्हा स्तरावर सहभागी झाले होते. 
    तालुका स्तरावर कुस्ती फ्रीस्टाईल मध्ये 36 कि लो वजनी गटात प्रथम क्रमांक नम्रता गोपीचंद म्हात्रे, 50 कि लो वजनी गटात प्रथम सार्थकी संतोष गाणेकर, मुले गटांत 52 कि लो वजनी गटात प्रथम क्रमांक भावेश गणेश भूनेसर, 36 कि लो वजनी गटात मानस चंद्रकांत पाटील द्वितीय क्रमांक,  बुध्दिबळ खेळात दिप्ती योगेश मांदाडकर द्वितीय क्रमांक पटकावला, योगासने जिल्हा स्तरावर वैयक्तिक रिधामिक उज्वला किशोर खोत प्रथम क्रमांक पटकावला,  सांघिक मुली योगासने मध्ये प्रथम क्रमांक नम्रता गोपीचंद म्हात्रे, उज्वला किशोर खोत चतुर्थ क्रमांक, योगासने मुले गटांत सांघिक प्रणय नरेश शितकर प्रथम क्रमांक , किशोर विश्वास खोत चतुर्थ क्रमांक पटकावला, मैदानी स्पर्धेत लांब उडी दिपाली वेटकोळी - तृतीय क्रमांक, थाळी फेक वृषाली म्हसकर तृतीय क्रमांक, गोळा फेक नम्रता म्हात्रे तृतीय क्रमांक, उंच उडी सई खोत तृतीय क्रमांक, जयेश शितकर थाळी फेक प्रथम क्रमांक, भावार्थ माळी उंच उडी तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व विद्यार्थी १४ वर्षांखालील वयोगटात खेळून यशस्वी झाले आहेत.
क्रीडा क्षेत्रासाठी भरीव मार्गदर्शन लक्ष्मण पाटील, उत्तम मांदारे, हेमंत पयेर,प्रसाद खोत,सागर घुबे, शुभम नाक्ती, अजय पयेर 
शाळा स्तरावरचे नियोजन मुख्याध्यापक शारदा कोळसे मॅडम, सहकारी शिक्षक संदिप शेबांळे सर, राम थोरात सर यांनी केले. व अथक परिश्रम क्रिडा शिक्षक श्री जयसिंग बेटकर सर यांनी घेतले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मांदाडकर, उपाध्यक्ष जगदीश खोत, सदस्य जनार्दन खोत, गणेश मांदाडकर, हरिश्चंद्र वेटकोळी, प्रभाकर कांबळे, रामचंद्र मांदारे, काशिनाथ माळी, जयप्रभा माळी,तारा पाटील, संपदा मांदारे, भिमा वेटकोळी आदी मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा