बँरिस्टर ए .आर. अंतुले प्रशासकीय भवन आधिकारी कर्मचाऱ्यां शिवाय रिकामे


बँरिस्टर ए .आर. अंतुले प्रशासकीय भवन आधिकारी कर्मचाऱ्यां शिवाय रिकामे : खासदार तटकरे यानी पंचायत समितीला प्रशासकीय भवन दिले आधिकारी कर्मचारी कोण देणार? नागरिकांचा सवाल


(संजय खांबेटे,म्हसळा)
महाराष्ट्र पंचायतराज्य व्यवस्थेत जिल्हास्तरावर उच्च दर्जा असलेली जिल्हा परिषद शिखर संस्था असते तर नागरिकांशी प्रत्यक्ष संबंध येत असलेली ग्रामपंचायत ही तळागाळातील संस्था आहे. पंचायत समिती या दोन संस्थांमधील महत्वाचा दुवा आहे. उद्दीष्ट व कार्याच्या दृष्टीने तिन्ही संस्था परस्परांवर अवलंबून आहेत. जिल्हा, तालुका आणि ग्रामपचायत पातळीवर म्हसळा तालुक्यातील या तिनही संस्था पुरेसा अधिकारी कर्मचारी वर्ग नसल्याने बेजार झाल्या आहेत. तालुक्यांतील नागरिकांची कामे अनेक फेऱ्या मारल्या शिवाय होत नाही असे चित्र आहे, पंचायत समितिचा कार्यभार सांभाळणारे गटविकास अधिकारी, सहय्यक Bdo, तालुका गटशिक्षण आधिकारी, तालुका आरोग्य आधिकारी ह्या महत्वाच्या विभागाना कार्यालय प्रमुखाची रिक्त आहेत  त्या विभागातील अन्य  ६० टक्के पदे रिक्त आहेत गामपंचायत  विभागां अर्तगत तालुक्यात  ८० गावातील  ३९ ग्रामपंचायती मार्फत गाव पातळीवर ग्रामसेवक अंत्यत प्रभावी कार्य  करीतअसतात, शासनाकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जातात.परंतु या योजनांची अंमल बजावणी गतीमान होत नाही,३९ ग्रामपचायती साठी केवळ १६ ग्रामसेवक तालुक्यात कार्यरत आहेत, पचायत समिती मध्ये पशुसंवर्धन ५० टक्के रिक्त, बांधकाम १०० % रिक्त, आरोग्य ६० % रिक्त पदे आहेत, मेंदडी प्रा आ केंद्रातील  एक वैद्यकिय अधिकारी, आणि म्हसळा प्रा .आ .केंद्रातील  एक स्त्रि परिचर याना गेले अनेक वर्ष  म्हसळ्यात काम न करताच वेतन दिले जात आहे. शिक्षण विभागात केंद्रप्रमुख ११ ,मुख्याध्यापक ६, पदवीधर शिक्षक ५८,  उपशिक्षक ८८, कनिष्ठ सहाय्यक २ अशी  ६०% पदे रिक्त आहेत. तशीच परिस्थीती ग्रा.पा.पुरवठा आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागांत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा