विकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन म्हसळा ITI साठी स्वतंत्र प्राचार्याची केली मागणी .


म्हसळा तालुका राष्ट्रवादी  काँग्रेसची विद्यार्थी संघटनेने बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन
शासन दरबारी  म्हसळा आय.टी .आय .साठी स्वतंत्र प्राचार्याची केली मागणी .
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शहनवाज उकये यानी म्हसळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विषयी असणाऱ्या समस्या ना.आदीती ताई तटकरे यांचे माध्यमातून सोडावायच्या  अनुषंगाने म्हसळा  आय .टी .आय आणि जितह्यांतील अन्य ४ संस्थाना मिळून एकच प्राचार्य असणे तर म्हसळा आय .टी .आय .साठी स्वतंत्र प्राचार्य , स्टाफ कमी आसल्यानी दर्जेदार प्रशिक्षण न मिळणे, इलेक्ट्रोनिक्स कोर्स साठी क्लास मध्ये विद्यार्थ्यांची क्षमता  वाढवून मिळणे आशा विविध आभ्यासू मागण्या मागितल्या  यावेळी अध्यक्ष शहनवाज उकये यांचे सोबत उपअध्यक्ष हसन चोगले, सचिव अबीद उकये होते , तात्काळ ना.आदीती ताई यानी दखल घेऊन  संबंधीत विभागाच्या सचिवां जवळ संवाद साधून शनवाज आणि अन्य पदाधिका
-याना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलुंड येथील कार्यालयांत संपर्क साधण्याचे सांगून, आयटीआय म्हसळा बाबत आवश्यकत्या उपाय योजना वरीष्ठांचे कानी घाला
असे धडे दिले. उकये यानी रायगड जिल्हातील पाच आय. टी. आय. ची संपूर्ण जबाबदारी एकाच मुख्याध्यापकांवर आहे. वरवठणे येथील संस्थेत शिक्षक वर्ग कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देता येत नाही आणि  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅकॅनिक्स ट्रेडसाठी विद्यार्थ्यांची संख्या  २१ जागा आहे त्या जागा वाढवून मिळाव्या, काही ट्रेड आता जुने झाले आहेत ते नविन टेक्नोलॉजी आणि डिजीटल मशीनरी वापरून शिकवावे , प्राचार्य पदासह अन्य ७ पदे रिक्त आहेत ती तात्काळ भरावी अशा महत्वाच्या मागण्या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे म्हसळा तालुका  अध्यक्ष शाहनवाज उकये यानी शासकिय औद्योगिक संस्था मुलुंड येथे केल्या .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा