म्हसळा - रायगड
केंद्र व महाराष्ट्र शासनाचे आदेशाने प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाचे सहकार्याने म्हसळा तालुक्यातील घुम रुद्रवट ग्रामपंचायत हद्दीतील मौजे घुम येथे आयुष्मान भव, "आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र साप्ताहिक आरोग्य मेळावा" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉक्टर श्रद्धा पाटील, आरोग्य सहाह्यक सुरेश म्हात्रे यांनी नागरिकांना स्वास्थ व निरोगी आरोग्य कसे राखावे,साथीचे आजार बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.ताप,सर्दी,खोकला,डोकेदुखी, अंगदुखी,डोळे येणे,हाता पायाला सूज येणे,त्वचेचे रोग, रक्तदाब कमी जास्त होणे आदि आजारा बाबत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले.आयुष्यमान योजने अंतर्गत भारत कार्ड काढणे व या योजनेविषयी सविस्तर माहिती नागरिकांना सांगण्यात आली.आयोजित मेळाव्याला डॉ.श्रद्धा पाटील,आरोग्य सहा.सुरेश म्हात्रे, श्रीकांत बीरवाडकर,लॅब टेक्निशियन अरबिना,ग्रामसेवक योगेश पाटील,आरोग्य सेविका ज्योती महाडिक,आशासेविका प्रेरणा महागावकर,डाटा ऑपरेटर मनोज नाक्ती,ग्रा.प.डाटा ऑपरेटर प्रसाद महागावकर,अंगणवाडी सेविका अक्षता बिरवाडकर,मदतनीस करुणा गायकर, अंगणवाडी सेविका संजना बोर्ले आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment