कुणबी पतसंस्थेने गेल्या २५ वर्षात लाखो कुटुंबाना केले अर्थसाह्य



ग्रामीण भागासाठी कुणबी पतसंस्था देते उद्योग व्यवसायाला बळ 
शेकडोहून अधिक व्यावसायिक झाले आत्मनिर्भर 

म्हसळा तालुक्यातील कुणबी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा रोप्य महोत्सव सोहळा म्हसळा ठिकाणी साजरा करण्यात आला या समयी कुणबी पतसंस्थेचे चेअरमेन महादेव भिकू पाटील यांनी उपस्थित सभासद कुणबी बांधवाना गेल्या २५ वर्षाचा आलेख मांडताना त्यांनी सांगितले यावेळी कुणबी समाज नेते माजी सभापती बहुजन समाजाचे स्नेही कै. एच डी. शिंदे यांच्या जीवन पटाचा उल्लेख करताना कुणबी पतसंस्था काढण्याचे खरे शिल्पकार शिंदे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेली २५ वर्षाची भली मोठी पतसंस्था कोटी रुपयाच्या उलाढालीमध्ये तालुक्यात काम करत आहे. यावेळी रोप्य महोत्सवाचे औचित्य साधून गेल्या २५ वर्षामध्ये ज्या चेरमेन व संचालक यांचा यथोचित सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ३२ संचालक व चेरमेन यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कुणबी वाहतूक संघाने संचालक व अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी १० वी १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी महादेव भिकू पाटील व्हाईस चेरमेन दिलीप मांडवकर माजी चेरमेन संचालक रामचंद्र बोर्ले, लक्ष्मन भाये, शंकर बेटकर, श्रीपत मनवे, महादेव खापरे, रमेश शिगवण, विजय शिंदे, निरमा राणे, शंकर घोलप, नारायण मालप, मधुकर पवार, रघुनाथ चाचले, राजाराम तिलटकर, मोहन शिंदे, कुणबी समाज उपाध्यक्ष लहू तुरे,  अंकुश खडस, मुंबई अध्यक्ष महेंद्र टिंगरे, उपाध्यक्ष महेश शिर्के, संघ उपाध्यक्ष बबन उंडरे, माजी अध्यक्ष राजाराम गावडे, कुणबी मुंबई बँक संचालक अशोक भुवड, महिला अध्यक्षा मिना टिंगरे, मुंबई अध्यक्षा स्नेहा खापरे, कुणबी व्यापारी वाहतूक संघाचे सर्व पदाधिकारी पतसंस्था व्यवस्थापक महेंद्र धामणे, संजय गुलगुले, ज्ञानेश्वर कोबनाक, अनंत अंबावले, प्रभाकर बोले, रायगड बँक व्यवस्थापक मंगेश मुंडे, सुरेंद्र शिर्के, विनोद धोकटे  तसेच सर्व संचालक कुणबी समाज पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेचा वार्षिक अहवाल व सूत्र संचालन बँकेचे वसुली अधिकारी तथा कुणबी समाज तालुका सचिव गणेश बोर्ले यांनी केले. रोप्य महोत्सव दिनानिमित्त तालुक्यातील कुणबी समाज विशेषतः महिला वर्ग सक्रीय झाला होता. 


रोप्य महोत्सव दिनानिमित्त पतसंस्थेचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी बारकोड अॅप्सचे अनावरण करण्यात आले. होम सेविंग कीटचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सभासदांनी बँकेच्या नवीन उपक्रमास टाळ्याच्या गजरात स्वागत  करण्यात आले.  


कुणबी पतसंस्थेने समाजाच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक कार्यात भरीव कामगिरी केली २५ वर्षात समाजाला उदयोग व्यवसायात चालना देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या बळावर तालुक्यात अनेक व्यावसायिक स्वतःच्या पायावरती उभे राहून सक्षम झाले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 
महेंद्र टिंगरे, कुणबी समाज अध्यक्ष मुंबई 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा