शहरांत अनेक पथकांत गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान ठरले अव्वल
(संजय खांबेटे, म्हसळा)
म्हसळा शहरांत गणेश पेठ,कुंभार समाज,श्रीराम पेठकर (वाणी - शिंपी समाज), मारवाडी-राजस्थानी समाज गोविंदा पथक, मुली - महिलांचा गोविदा आशा विविध गोविंदा पथकांचे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे स्वागत करून म्हसळा येथे सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करताना वेगळाच सास्कृतिक ठसा उमटवून या मंडळाने आदिवासी युवक, महिला मंडळ यांचा सुद्धा सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी हा विचार जपला देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पुर्ण झाले असून त्यानिमित्ताने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" ही दहीहंडीला थिम ठेवण्यात आली होती असे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे यानी सांगितले, शहरांतील विविध समाजाचे मंडळी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान चे सदस्य आसल्याने आमचे विचार सर्वदूर पसरत आसल्याचे सांगता नाच "वसुधैव कुटुंबकम " या भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक धोरणा नुसार विविधतेतून एकता साधण्यासाठी आम्ही हा पायंडा राबवित आसल्याचे करडे यानी सांगितले .तालुक्यांत १९३ सार्वजनिक तर १७३० खाजगी उत्सव साजरे होत आसत्याचे पोलीस आणि महसुल विभागाकडून सांगण्यात आले. खाजगी कार्यम्रतात श्रीमती मिनिल ढवळे यांच्या घरील कार्यक्रमाचे विशेष कौतुक झाले .शहरातील बहुतांश गोविंदाचे पथकांत दादा पानसरे समीर बनकर, सुरेश कुडेकर, प्रविण उर्फ बाबू बनकर, सुनिल उमरटकर,संजय कर्णिक, अनिकेत पानसरे सुनिल अंर्जलेकर,बडू जोशी,भाई बोरकर, गणेश हेगिष्टे, हेमंत करडे, विशाल करडे, राहुल पोतदार, महावीर जैन
सौरभ पोतदार, भालचंद्र उर्फ छोटा दादा करडे, यतीन करडे, सचिन शेटे, मंगेश बोरकर, उदय उर्फ बाळू करडे यांचा सक्रीय सहभाग होता .
शहरांतील सामाजिक उत्सवात "विविध समाजांतील सामाजिक .राजकिय नेतृत्व गुणानी सहभाग घेताला तर तंट्याचे प्रमाण होतच नाही. तर समाजांत एकोपा वाढतो असे अनेक वेळा आढळते"
संदीपान सोनावणे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन . म्हसळा
Post a Comment