(म्हसळा प्रतिनिधी )
म्हसळा बॅडमिंटन क्लबने नुकत्याच म्हसळा तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या स्कूल अँड कॉलेज बॅडमिंटन स्पर्धेमध्ये निहार आणि आयर्न रोहा विरुद्ध अयान कादरी आणि ईतीशाम कादरी म्हसळा यांच्यात फायनल खेळले गेली अत्यंत अशा चुरशीच्या सामन्यांमध्ये रोहा टीमने म्हसळा टीमला पराभूत करून अंतिम विजेतेपद पटकावले. तर म्हसळ्यातीलअयान कादरी आणि ईतीशाम कादरी याना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिसरा क्रमांक विहान आणि ध्रुव बागमाडला आणि चौथा क्रमांक ऊझरआणि . उमेर आयडियल स्कूल म्हसळा असे आले , यावेळी आयोजकांतर्फे सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेटस आणि मेडल देऊन गौरवण्यात आले .स्पर्धतील प्रथम क्रमांकासाठी नाझीम भाई हसवारे आणि यतीन करडे यांनी प्रथम आणि द्वितीय बक्षीस दिले म्हसळा बॅडमिंटन क्लब तर्फे इम्रान कादरी अकलाक कादरी यतिन करडे मोहित मेहता , ऊझेरआणि अझेन कादरी झोहेब हलदे अबिद बताली यांनी विशेष . मेहनत घेतली तळा,रोहा,माणगाव, गोरगाव, श्रीवर्धन परिसरातून एकुण २० टीमने सहभाग घेतला होता असे आयोजक मोहीत मेहता यानी सांगितले.
Post a Comment