म्हसळ्यातील निर्भीड पत्रकार अशोक काते यांची रायगड जिल्हा शांतता समितीच्या सदस्यपदी नेमणूक


म्हसळ्यातील निर्भीड पत्रकार अशोक काते यांची रायगड जिल्हा शांतता समितीच्या सदस्यपदी नेमणूक : सर्वत्र होत आहे कौतुक.

(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा  गवळवाडी येथील सामाजिक चळवळीतील निर्भीड पत्रकार अशोक काते यांची रायगड जिल्हा शांतता समितीच्या अशासकीय  सदस्यपदी नेमणूक झाली त्याबदल  त्यांचे तालुक्यात आणि जिह्यांत सर्वत्र कौतुक होत आहे. काते यांचा शैक्षाणिक, सामाजिक,शासकिय आणि राजकिय आभ्यास  गाढा असून त्या सर्व गुणामुळे काते यांची 
शांतता समितीच्या सदस्यपदी  खासदार तटकरे याच्या शिफारसीमुळे नेमणूक  झाली आसल्याबाबतचा खुलासा, काते यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील यानी केला,यावेळी सार्वजनिक वाचनालय म्हसळाचे अध्यक्ष सजय खांबेटे,म्हसळा टाइम्सचे संपादक रमेश पोटले, पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, विलास रिकामे, सरपंच अनंत 
नाक्ती,ग्रंथपाल उदय करडे,पांडूदादा पाटील यानी  प्रत्यक्ष भेटुन अभिनंदन केले. अशोक काते सचिव म्हणून सार्वजनिक वाचनालय म्हसळा आणि जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा,अध्यक्ष यादव 
(गवळी)  उन्नती संस्था समाज म्हसळा ,अध्यक्ष - गवळवाडी ग्रामस्थ मंडळ म्हसळा, सदस्य रायगड जिल्हा व म्हसळा तालुका प्रेस क्लब, सदस्य - शांतता समिती म्हसळा, भ्रष्टाचार निर्मुलन समिती ता.म्हसळा आशा विविध संस्थावर काते  कार्यरत आहेत. त्याच्या अनुभवी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून १० वर्षे काम , अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती  आशा विविध  पदांवर कार्य केल्याचा गाढा अनुभव आहे, ना.आदितीताई तटकरे. आमदार अनिकेतभाई तटकरे यानी काते यांचे मोबाईल वर फोन करून आभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना काते यानी आम्ही सामाजिक पातळीवर काम करीत असताना पोलीसातील माणुस, आणि माणसातील पोलीस ओळखून प्रशासनाला सहकार्य करणार आसल्याचे भावनात्मक सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा