(छाया.समीर रिसबूड.)
श्रीवर्धन(समीर रिसबूड)
श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया भक्कम आहेच.पण नवनियुक्त्यांनी श्रीवर्धन तालुक्यात नवचैतन्य निर्माण होईल.आगामी होत असलेल्या निवडणुकींच्या दृष्टीने जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडे महत्वाच्या जबाबदार्या दिल्या आहेत.भविष्यातही श्रीवर्धन तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला असेल.असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी बोर्लीपंचतन येथे श्रीवर्धन मतदारसंघ अध्यक्ष मोहंमद मेमन यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या नवनियुक्त्यांच्या बैठकी दरम्यान केले.
माजी जिल्हा परिषद उपसभापती तसेच उत्तम संघटक शामकांत भोकरे यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्तेपदी तर सुकुमार तोंडलेकर यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदावर खासदारांनी नियुक्ती केली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे,सरपंच ज्योती पारकर,स्वप्निल बिराडी,संतोष गायकर हे मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment