तळा-किशोर पितळे
नाभिक समाजाचे आराध्य दैवतसंत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे निमित्ताने सामाजिक सभागृहाचे उद्घाटन व वास्तुशांती समारंभ आज ११सप्टेंबर २०२३ रोजी शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून उद्घाटन करण्यातआले.त्यापूर्वी वास्तूचे पूजन, होम हवन व संत श्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे पुजा विधीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ७ वाजता वास्तुशांतीकार्यक्रम व संत सेना महाराज व वीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमांना पुष्पमालिका अर्पुन कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाला कोअर कमिटी सदस्य तथा स्वीकृत नगरसेवक लिलाधर खातू नगरसेवक नरेश सुर्वे माजी सरपंच नमित पांढरकामे,उपतालुका प्रमुख तांदळेकर, शशीठमके,ज्येष्ठ समाज बांधव मारुती शिर्केव्यासपीठा वर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना ठसाळ म्हणाले की तळ्यातील नाभिकसमाज यांची माननीय आमदार भरत शेठ गोगावले व जिल्हाध्यक्ष प्रमोद जिल्हाप्रमुख यांच्या सहकार्यातून आमदार फंडातून११ लाख त्या निधी उपलब्ध करून समाजाची उणीव भरून काढली असून ११ लाखांमध्ये ही वास्तू पूर्ण झाली आहे आज सुंदर असे सभागृह झाल्यामुळे आनंद निर्माण झालेला नाभिक समाजबांधवाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असलेले पाहून आम्हाला आम्ही केलेल्या कामाचं सार्थक झाले.वाडीतीलफ्लेवर ब्लाॅक बसवून दिले असे आश्वासन दीले यावेळी लीलाधर खातू यांनी देखील मनोगतातून सांगितले की विधानसभा निवडणुकीच्या वेळी तो शब्द दिला होता तो आज शिवसेनेच्या माध्यमातून आणि पूर्ण करू शकलो आणि आज त्याचं संतश्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी लोकांर्पण होत असल्याचा आम्हा सगळ्या मंडळींना निश्चित आनंद आहे यामध्ये शहर प्रमुख, तालुकाप्रमुख आणि आम्ही कार्यकर्ते यांनी हा मोठ्या किती अडचणी जरी आल्या तरी देखील आम्ही सभागृह बांधून देऊ.अशी ग्वाही दिली होती आणि ती आज पूर्ण झाली माझ्या समाज बांधवांनी दिलेले सहकार्यातून आज सगळं झालेला आहे असे त्यांनी व्यक्त केल्या.या आनंददायी कार्यक्रमासाठी अध्यक्ष रुपेश साळुंखे, उपाध्यक्ष संजय शिर्के सचिव वैभव शिर्के सल्लागार मंगेश शिर्के, योगेश शिर्के, मनोज साळुंखे,किशोर कदम, अशोक खंडागळे सुभाष शिर्के, समाज बांधवमहीला मोठ्याने संख्येने उपस्थित होते.
Post a Comment