श्रीवर्धन : समीर रिसबूड
श्रीवर्धन तालुक्यात एकूण अठ्ठयाहत्तर खेडेगावे आहेत. त्यातील काही खेडेगावं ही आड रस्त्याला किंवा डोंगराळ भागात वसलेली असून तेथील ग्रामस्थांना शहरात कामानिमित्त जायचे म्हणजे खाजगी वाहनाने श्रीवर्धन, बोर्लीपंचतन गाठून शहराकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकानुसार संबंधित ठिकाणावर दाखल व्हायला लागायचे. नानवेल, आदगाव, सर्वे, धनगरमलई अशा दुर्गम भागातील तसेच शेखाडी, कोंडवील या आड मार्गावरील प्रवासीवर्गाने श्रीवर्धन आगाराकडून शहरात जाण्यासाठी गाड्या सुरू कराव्यात अशी विनंती श्रीवर्धन आगारप्रमुखांकडे केली होती.
प्रवासीवगनि केलेल्या मागणीप्रमाणे श्रीवर्धन नानवली धनगरमलई म्हसळा-मुंबई ही गाडी सकाळी पाच वाजता श्रीवर्धन येथून मुंबईकडे मार्गस्थ होईल तर मुंबईहून परतीसाठी रात्री नऊ वाजता मार्गस्थ होत वरील मार्गाप्रमाणे श्रीवर्धन येथे येईल. शेखाडी, कोंडीवली, भरडखोल येथील प्रवाशांसाठी श्रीवर्धन नालासोपारा ही गाड़ी सुरु करण्यात आली असून श्रीवर्धन येथून सकाळी साडेआठ तसेच नालासोपारा येथून रात्री अकरा श्रीवर्धन येथे मार्गस्थ होणारी गाडी श्री सोमजादेवी मंदिर मार्गे वाळवटी, शेखाडी, दिवेआगर, बोर्लीपंचतन मार्गे नालासोपारा येथे जाणार असून गाडी जाताना व येताना मार्ग वरील प्रमाणे असेल. असे आगारप्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.
गणपती उत्सवाचा हंगाम आटोपल्यावर लगेचच श्रीवर्धन आगारातून श्रीवर्धन दिवेआगर कल्याण, श्रीवर्धन दापोली रत्नागिरी, श्रीवर्धन बोर्लीपंचतन भांडूप आणि श्रीवर्धन पुणे सोलापूर अक्कलकोट या चार गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासीवगनिही कुठल्या मार्गावर गाड्या सुरू करावयाच्या असतील तर श्रीवर्धन आगारप्रमुखांशी संपर्क साधावा.
- महिबूब मणेर, श्रीवर्धन आगारप्रमुख
Post a Comment