म्हसळा (वार्ताहर)
म्हसळा तालुक्यातील आगरवाडा सारख्या अतिदुर्गम भागातील गवंडी काम करणारे नारायण काशिनाथ नाक्ती यांची मुलगी कुमारी रितू नारायण नाक्ती हिने डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी मधून डेंटल पदवी मिळून पुणे जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. दहावी पर्यंतचे शिक्षण तीने वरवठणे -आगरवाडा येथील जिजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतून पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी तीने पिंपरी -पुणे जाणे पसंत केले आणी दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात उतुंग झेप घेतली. डेंटल पदवी मध्ये तीने पुणे जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आणी आपल्या आई -वडिलांसह गावाचे, तालुक्याचे, शाळेचे पर्यायाने संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्वल केले. या पुढेही शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेण्याचा मनोदय रितू हिने आमच्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केला. नारायण नाक्ती हे अतिशय मेहनती असून काभाड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना पुण्या सारख्या शहरामध्ये शिक्षण देऊन आपली जबाबदारी पार पाडली. आज श्रावणी सोमवारच्या शुभ दिनी रितू हिचे अभिनंदन करून तीचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी तीचे वडील नारायण नाक्ती, आई नम्रता नाक्ती, चुलते सुनील नाक्ती, चुलती सुप्रिया नाक्ती, सुधाकर जंगम, महेश जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण जिल्ह्यातून रितू चे भरभरून कौतुक होत आहे.
Post a Comment