Ayushman Bhav Abhiyan : आयुष्मान भव अभियान योजना काय आहे? कसा घ्याल मोफत हेल्थ चेकअपचा लाभ?

टीम म्हसळा लाईव्ह
आयुष्मान भव अभियान योजना (Government Health Scheme) :
हा एक देशव्यापी उपक्रम आहे ज्याचा उद्देश प्रत्येक गाव आणि शहरात आरोग्य सेवा प्रदान करणे आहे.
खरं तर, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशव्यापी आरोग्य मोहीम राबविण्यात येणार आहे, ज्या अंतर्गत आरोग्य (Health) आणि वेलनेस सेंटरवर आयुष्मान शिबीर आयोजित केले जातील आणि लोकांची आरोग्य तपासणी केली जाईल. याशिवाय अनेक जनजागृती कार्यक्रम जसे रक्तदान आणि अवयवदान मोहीमही राबविण्यात येणार आहे.

60 हजार लोकांना आयुष्मान भारत कार्ड देण्यात येणार आहे

आयुष्मान भव योजनेंतर्गत 60 हजार गरीब लोकांना आयुष्मान भारत कार्ड दिले जाणार असून त्याअंतर्गत त्यांना वार्षिक 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. या मोहिमे अंतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून आरोग्य व वेलनेस सेंटर उघडण्यात येणार असून तेथे लोकांची मोफत तपासणी केली जाणार आहे.

मेडिकल कॉलेज आणि ब्लॉकमध्ये आरोग्य शिबिरे लावली जाणार आहेत

या अभियानांतर्गत केवळ गरिबांसाठीच नाही तर मध्यमवर्गीयांसाठीही आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या कालावधीत सर्व जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि ब्लॉकमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, जेथे लोकांची मोफत चेकअप केले जाईल. याशिवाय या कार्डप्रमाणे मोफत (Free) उपचारही केले जाणार आहेत. याशिवाय या मोहिमेअंतर्गत लोकांना आजार आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबाबत जागरूक केले जाणार आहे


Ayushman Card : 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. आयुष्मान भारत योजनेत मोफत उपचार घेता येतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येतात.

देशातील प्रत्येक वर्गाच्या चांगल्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने खास योजना आणली आहे. मोदी सरकारने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची (Ayushman Bharat Yojana) सुरुवात केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येईल. केंद्र सरकारने ही योजना 23 सप्टेंबर, 2018 रोजी सुरु केली होती. या योजनेत किरकोळ उपचारापासून शस्त्रक्रियेचा लाभ घेता येतो.   या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेता येतो. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा