तालुक्यात "गौरी गणपती सणात १०० रुपयात आनंदाचा शिधा" पुरवण्यात येणार


म्हसळा प्रतिनिधी
राज्य शासनातर्फे मागिल वर्षाचे दिवाळी प्रमाणेच या वर्षी ”गौरी गणपती आणि दिवाळी साठी  " १०० रुपयात आनंदाचा शिधा राज्यातील रेशन कार्ड धारकाना देण्यात येणार आहे. त्यात बी .पी .एल् , केशरी, शेतकरी शिधा पत्रिका -कार्ड धारकाला एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल आशा ४ वस्तूंचा शिधा सरकारकडून पुरवण्यात येणार आहे.आनंदाचा शिधा  दोन वेळा मिळणार आहे १५ ते ३० सप्टेंबर रोजी गणपती उत्सवा निमित्त  हा आनंदाचा शिधा तो गौरी गणपती साठी   आणि दुसरा  दिवाळीला १२ नोव्हेंबर ते १५ ऑक्टोबर २०२३ शिधावाटप दिवाळी साठी शासनामार्फत चालू केले जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा एक किलो रवा, चणा डाळ, साखर, खाद्यतेल आशा ४ वस्तूंचा शिधा सरकारकडून केवळ रु१०० मध्ये पुरवण्यात येणार आहे .राज्यातील एकूण १ कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधा पत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा शासनामार्फत दिला जाणार आहे.म्हसळा तालुक्यातील ८५ गावांतील  ४५ रेशन विक्री केंद्राचे माध्यमातून ११ हजार ८०० शिधा पत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा शासना मार्फत रु १०० ला दिला जाणार आसल्याचे नायब तहसीलदार गणेश तेलंगे यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा