म्हसळा-रायगड
गावाचा विकास व्हावा आणि पक्षात मानाचे स्थान मिळत नसल्याने गोंडघर गावातील शेकापच्या कट्टर कार्यकर्त्यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळुन अखेर खासदार सुनिल तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विकास रथात जाहीर पक्ष प्रवेश केला.जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी सरपंच अक्रम साठविलकर यांचे पुढाकाराने गोंडघर येथील शेकापचे झूंजार युवा कार्यकर्ते प्रकाश पाटिल,योगेश पाटील यांच्या निवासस्थानी खासदार सुनिल तटकरे यांचे स्वागत भेटीत गोंडघर गावातील शेकापचे गोविंद नाईक,सविता नाईक,जितु शहा,आगिणी शहा,नितेश नाईक,राजश्री नाईक,भारती नाईक,राकेश म्हाप्रलकर,नंदिनी म्हाप्रलकर,राजश्री धुमाळ,कल्पेश धुमाळ,कुणाल धुमाळ,रुपेश धुमाळ, अंजनी धुमाळ,योगेश पाटील,निलम पाटिल,भरत पाटिल,गामला पाटील,दर्भणा पाटील,सत्म पाटिल,संतोष पयेर,गुलाब पयेर,गणेश धुमाळ,प्रकाश पाटील,प्रतिक्षा पाटिल आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.खासदार सुनिल तटकरे यांनी पक्ष प्रवेश कर्त्या गोंडघर गावातील शेकाप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करून गाव विकास आणि पक्षात मानाचे स्थान मिळणार असल्याचे आश्र्वासित केले आहे.
Post a Comment