निलेश मांदाडकर यांच्या निवासस्थानी चंद्रयान - ३ चा सुरेख देखावा


म्हसळा - खरसई गावातील निलेश परशूराम मांदाडकर युवकांचे प्रेरणास्थान यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले यावेळी चंद्रयान - ३ चा सुंदर देखावा निर्माण करण्यात आला आहे. इसरो या संशोधन संस्थेने नुकतेच चंद्रयान - ३ यान चंद्रावर पाठवले यशस्वी पणे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरले आणि भारत जगाच्या इतिहासात महत्वपूर्ण कार्य केले दिसून आले.

      भारतीय संशोधनानी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.या मोहिमेत ५४ महिला संशोधक म्हणून सहभागी होत्या , त्यांच्या या प्रयत्नांना सफलता पूर्वक यश मिळाल्याने भारतीय सर्व महिला व पुरुष संशोधक यांचे देखाव्यातून मांदाडकर कुढुबांनी प्रयत्न केला आहे. सदर आकर्षक देखावा पाहण्यासाठी गावासह पंचक्रोशीत नातेवाईक, गणेश भक्त, गावातील नागरिक यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. मांदाडकर कुढुंबातील विजय पयेर,जितेंद्र मेंदडकर (सिव्हिल इंजिनिअर) , गणेश मांदडकार, निशांत मेंदाडकर ( इंजिनिअर),वेदांत मांदाडकार, मुग्धेश मांदाडकर,जिविका मांदादकर यांनी आकर्षक देखावा तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा