दक्षिण रायगड महिला अध्यक्षपदी हेमा मानकर यांची फेर निवड. जिल्हा कार्यकारीणी सदस्यपदी ऍड.दिव्या रातवडकर.



तळा : किशोर पितळे
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमी वर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्या प्रमुख धैर्यशीलपाटील यांच्या शिफारशीने जिल्हा कार्यकारीणी नियुक्ती केली असून दक्षिण रायगड महिला अध्यक्षपदी हेमा मानकर यांची पुनर्निवड करण्यात आली. हेमाताई मानकर या अतिशय कार्यक्षम अशा कार्यकर्त्या म्हणून लौकिक आहे. महिलांसाठी काम करीत असतात पक्षासाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या पदावर मागील काळात निवड झाली होती हेमा मानकर यांनी प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांच्यासंकल्पनेतून "मेरी माटी मेरा देश" या अभियानात विविध ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून या चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे त्यांच्याकामाची दखल घेऊन रायगड महिला अध्यक्षपदी निवड केली आहे तसेच जिल्हा कार्यकारीणी सदस्यपदीऍड.दिव्या रातवडकर (नगरसेविका तळा नगरपंचायत) यांची देखील निवड झाली आहे भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी खंद्य्या‌ पदाधिकाऱ्यांची निवडकरून पक्ष मजबुतीची जबाबदारी देण्यात आली आहे सन २०२४ च्या निवडणुकीची रणनीतीच्या दृष्टीने रायगड लोकसभा, विधानसभा मतदार संघातील दक्षिण रायगडात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित कार्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत या दृष्टीने भाजपमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा