टीम म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील सुपुत्र मा श्री प्रोफेसर सचिनजी कांबळे सर यांना १३ ऑगस्ट २०२३ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी चा सांस्कृतिक सभागृह मुंबई शहर येथे पुरस्कार प्राप्त झाला. पुरस्कारांचे स्वरूप मानकरी बॅच, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, गौरव चिन्ह असे होते.
त्यांचे शिक्षण पी.एच.डी. झाले असून सध्या ते श्री भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक कॉलेज विलेपार्ले मुंबई ( शासन मान्य संस्था) गेली दहा वर्षे या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सामाजिक कार्य विविध सामाजिक मंडळांना हातभार लावणे व विविध विषयांवर व्याख्याने देणे, तसेच शैक्षणिक कार्य करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणे, विशेष म्हणजे विद्यार्थी दत्तक घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करणे , नविन शैक्षणिक धोरणानुसार नाविन्यपूर्ण शिक्षणात नविन काय घेता येईल आणि नविन पिढीला देता येईल यावर सर्वाधिक लक्ष वेधून कार्य करणे, समाजातील प्रत्येक घटकांतील बांधव शिकला पाहिजे आणि स्वतःच्या पायांवर उभा राहिला पाहिजे अशी मार्गदर्शनाची ज्ञानज्योत तेवत ठेवणारे खरसई गावातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा श्री सचिनजी कांबळे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२३ प्राप्त झाल्याने गावातील सर्वंच क्रीडा मंडळ, ग्रामस्थ, महिला मंडळ यांनी कौतुक केले आहे.
तसेच अ.ना. कांबळे गुरुजी यांचे सुपुत्र सचिनजी कांबळे यांना पुरस्कार मिळताच खरसई गावासह पंचक्रोशीत आणि म्हसळा तालुक्यात सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
Post a Comment